news
लोणावळ्यात घुमला ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा! पिंपरी-चिंचवड भाजपच्या निवासी प्रशिक्षण वर्गात दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शनपिंपरीच्या राजकारणात मोठा भूकंप! “महेश लांडगे यांना आमदार करण्यात माझाच वाटा”, माजी महापौर मंगला कदम यांची जाहीर कबुलीकामगार नगरीत श्रमिकांचा महाकुंभ! आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत चिंचवडमध्ये हजारो कामगारांचे शक्तीप्रदर्शनरांजणगावात थरार! पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकावर दोन राऊंड फायर; पोलिसांचेही प्रत्युत्तरादाखल ४ राऊंडपिंपरी पालिकेचे महाप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सरसावले! अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
Home पिंपरी चिंचवड कामगार नगरीत श्रमिकांचा महाकुंभ! आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत चिंचवडमध्ये हजारो कामगारांचे शक्तीप्रदर्शन

कामगार नगरीत श्रमिकांचा महाकुंभ! आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत चिंचवडमध्ये हजारो कामगारांचे शक्तीप्रदर्शन

काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील सात कष्टकऱ्यांना 'श्रम प्रतिष्ठा गौरव पुरस्कार'; पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेशदादा लांडगे चिंचवडमध्ये भव्य कामगार मेळावा उत्साहात संपन्न

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, १८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “पिंपरी चिंचवड ही कामगार नगरी तसेच औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. यामुळेच येथील कामगारांचे प्रश्न देखील विविध स्वरूपाचे आहेत. हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि तमाम महाराष्ट्रातील संघटित व असंघटित कामगारांना न्याय मिळवून देत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कामगारांचे हे प्रश्न आगामी विधानसभेमध्ये नक्कीच मांडणार,” असे ठाम आश्वासन आमदार महेशदादा लांडगे यांनी दिले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र राज्य आणि क्रांती कष्टकरी असंघटित कामगार संघ यांच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य कामगार मेळावा चिंचवड येथील संभाजीनगर, थरमॅक्स चौक येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याची सुरुवात ‘आता उठवू सारे रान’ या प्रेरणादायी गीताने करण्यात आली.

आमदार लांडगे पुढे म्हणाले की, कामगारांचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्यांच्याशी माझा नेहमीच थेट संवाद असतो. संघटना सातत्याने काम करत असल्यानेच आज विविध घटकांना न्याय मिळत आहे. अशा कामगार हित जपणाऱ्या संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य असून बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

यावेळी संघटनेचे नेते काशिनाथ नखाते यांनी, “समाजाच्या प्रगतीचा पाया हा श्रमिकांच्या कष्टांवर उभा असतो,” असे सांगत कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला.

या मेळाव्यात सामाजिक प्रतिष्ठेला बळ देण्यासाठी विशेष “श्रम प्रतिष्ठा गौरव पुरस्कार वितरण सोहळा” पार पडला. पायल चव्हाण (घरेलू कामगार), रामभाऊ हाके (हातगाडी चालक), महादेव सोनवणे (रिक्षा चालक), बबन बहिरवाल (बिल्डिंग/बांधकाम कामगार), शंकर बुरकुले (सुरक्षा रक्षक), अनुरथ साबळे (स्वच्छता कामगार), काकासाहेब भोईटे (शववाहिका वाहन चालक) हा बहुमानाचा पुरस्कार श्रमिकांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात उत्कृष्ट महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कामगारांचा सत्कार झाला. कामगारांना विविध शासकीय योजनांच्या लाभांचे (सुरक्षा साधने) वाटपही करण्यात आले. याशिवाय, कामगारांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या विशेष प्राविण्याबद्दल त्यांचे जाहीर कौतुक करून विविध शिष्यवृत्ती योजनांचे धनादेश (चेक) मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

या मेळाव्याला कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेवक निलेश नेवाळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, जालना जिल्हाध्यक्ष भगवान काळे, हिंदुराव पाटील, गोरख पाटील, किरण साडेकर, राजू बिराजदार, सचिन नागणे, जनाबाई वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज निलवर्ण, राजेश माने, सुरज देशमाने, बालाजी लोखंडे, नाना कसबे, तुषार घाटुळे, वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, अर्चना कांबळे, लक्ष्मी गायकवाड, सुनिता पोतदार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सुनील भोसले यांनी मानले.

या मेळाव्याला कष्टकरी, कामगार, फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम कामगारांसह असंघटित क्षेत्रातील हजारो कामगार बांधवांनी अलोट गर्दी करत कामगार एकजुटीचे भव्य शक्तीप्रदर्शन घडवून आणले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!