news
लोणावळ्यात घुमला ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा! पिंपरी-चिंचवड भाजपच्या निवासी प्रशिक्षण वर्गात दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शनपिंपरीच्या राजकारणात मोठा भूकंप! “महेश लांडगे यांना आमदार करण्यात माझाच वाटा”, माजी महापौर मंगला कदम यांची जाहीर कबुलीकामगार नगरीत श्रमिकांचा महाकुंभ! आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत चिंचवडमध्ये हजारो कामगारांचे शक्तीप्रदर्शनरांजणगावात थरार! पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकावर दोन राऊंड फायर; पोलिसांचेही प्रत्युत्तरादाखल ४ राऊंडपिंपरी पालिकेचे महाप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन सरसावले! अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
Home पिंपरी चिंचवड पिंपरीच्या राजकारणात मोठा भूकंप! “महेश लांडगे यांना आमदार करण्यात माझाच वाटा”, माजी महापौर मंगला कदम यांची जाहीर कबुली

पिंपरीच्या राजकारणात मोठा भूकंप! “महेश लांडगे यांना आमदार करण्यात माझाच वाटा”, माजी महापौर मंगला कदम यांची जाहीर कबुली

राष्ट्रवादीत राहून गद्दारी केल्याची मंगला कदमांची जाहीर कबुली; भाजप आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत सावळ्या गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘घर का भेदी लंका ढाए’! मैदान अनधिकृत मंदिराचं, पण विषय निघाला आमदारकीच्या सेटिंगचा; मंगला कदमांच्या वक्तव्याने पिंपरीत खळबळ

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, १८ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. “घर का भेदी लंका ढाए” या उक्तीचा प्रत्यय आणून देणारा एक जाहीर प्रकार शहरात घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) ज्यांना शहराचे महापौरपद दिले, पालिकेत सत्तारूढ पक्षनेते केले आणि थेट आमदारकीचे तिकीटही दिले, त्याच माजी नगरसेविका मंगला कदम यांनी पक्षाशी गद्दारी करून भारतीय जनता पक्षाचे (BJP) विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांना निवडून आणण्यासाठी माझा मोठा वाटा होता, अशी जाहीर व ठाम कबुली दिली आहे. एका अनधिकृत मंदिराच्या वादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या प्रसंगी स्वतः मंगला कदम यांनी या राजकीय ‘सेटिंग’वर शिक्कामोर्तब केल्याने शहरात राजकीय भूकंप झाला आहे.

घटना अशी आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका खेळाच्या मैदानामध्ये उभारण्यात आलेल्या अनधिकृत मंदिराच्या सावळ्या गोंधळामुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजप आमदार महेशदादा लांडगे हे स्वतः कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी आले होते. यावेळी वाद मिटवण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या मंगला कदम यांनी थेट आमदारकीच्या अंतर्गत सेटिंगचाच विषय जाहीरपणे उकरून काढला.

तणावाच्या वातावरणात बोलताना मंगला कदम यांनी थेट आमदार महेश लांडगे यांच्यासमोरच जाहीरपणे सांगितले की, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतानाही, पक्षाशी एकनिष्ठ न राहता अंतर्गत पातळीवर भाजपचे महेश लांडगे यांना निवडून आणण्यासाठी काम केले. त्यांना आमदार बनवण्यात माझा मोठा वाटा आहे.”

मंगला कदम यांच्या या धक्कादायक विधानाला आणि त्यावेळच्या संपूर्ण परिस्थितीला स्वतः मंगलाताई कदम यांनीच पुष्टी दिली आहे. एका सार्वजनिक आणि संवेदनशील मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान थेट आमदारकीच्या निवडणुकांमधील अंतर्गत तडजोडीचा आणि गद्दारीचा विषय समोर आल्याने उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पक्षाने सर्व काही पदे देऊनही केवळ अंतर्गत स्वार्थासाठी आणि सेटिंगच्या राजकारणासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारा पाठीत खंजीर खुपसण्याचे काम मंगला कदम यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. “पक्षाने ज्यांना मोठे केले, त्यांनीच पक्षाची ‘लंका’ ढासळण्याचे काम केले,” अशा शब्दांत नेटकरी आणि राजकीय विश्लेषक मंगला कदम यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

अनधिकृत मंदिराच्या सावळ्या गोंधळातून समोर आलेल्या या नव्या राजकीय गौप्यस्फोटामुळे येत्या काळात पिंपरी चिंचवडच्या राजकारणाला कोणते नवीन वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!