news
पिंपरी-चिंचवडमध्ये उप-वर्गीकरणाच्या मागणीसाठी हिंदू मातंग एकता सेना आणि शिवशाही शासन पक्षाचे शक्तीप्रदर्शनमोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी पिंपरी मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; दोन बड्या अभियंत्यांची तडकाफडकी हकालपट्टीपिंपरी-चिंचवड मनपाच्या १० प्रभाग समित्यांवर नव्या कारभाऱ्यांची बिनविरोध निवड; प्रजित नायर यांनी पाहिले पीठासीन अधिकारी म्हणून कामअमरावती अंनिसच्या शहर अध्यक्षपदी मिलिंद तायडे; पाक्षिक सभेत जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा निर्धार‘वर्ल्डस्किल्स’ जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवण्याची हुकमी संधी; ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ चा रणसंग्राम सुरू
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत पालिकेचा बुलडोझर गरजला! जॉगर्स पार्क उद्यानाजवळील १५०० चौरस मीटरचे विस्तीर्ण अतिक्रमण जमीनदोस्त

पिंपरीत पालिकेचा बुलडोझर गरजला! जॉगर्स पार्क उद्यानाजवळील १५०० चौरस मीटरचे विस्तीर्ण अतिक्रमण जमीनदोस्त

फ क्षेत्रीय कार्यालयाची मोठी कारवाई; ६ जेसीबी, ८ मजूर आणि ५७ सुरक्षा जवानांच्या फौजफाट्यासह अतिक्रमणे जमीनदोस्त | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी पालिकेचा अनधिकृत बांधकामांना दणका; प्रभाग ११ मधील ‘जॉगर्स पार्क’ परिसरातील तब्बल १५०० चौ. मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २० मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्क उद्यान परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज धडक कारवाई करण्यात आली. पालिकेच्या या धडक मोहिमेत जॉगर्स पार्क परिसरातील सुमारे १५०० चौरस मीटरचे विस्तीर्ण क्षेत्र पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहे. शहरातील सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे, उद्यानांचे संवर्धन करणे आणि अनधिकृत बांधकामांना आळा घालणे या मुख्य उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या थेट निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या नियंत्रणाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली.

कारवाईदरम्यान उप आयुक्त अतुल पाटील, प्रशासन अधिकारी महादेव बोरे, बांधकाम परवानगी विभागाचे उप अभियंता किरण सगर, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, तसेच उद्यान स्थापत्य व क्रीडा विभागाचे कनिष्ठ अभियंता वैभव विटकरे हे स्वतः मैदानात उपस्थित होते. याशिवाय, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) साक्षी जांभुळकर, निकिता भोईटे, विकास वारभुवन आणि रूपक शिनगारे यांनीही या कारवाईत सक्रिय सहभाग नोंदविला.

जॉगर्स पार्क परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आणि यंत्रसामग्री तैनात केली होती. या कारवाईसाठी ‘फ’, ‘अ’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांमधील एकूण ५७ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान तैनात करण्यात आले होते. याशिवाय १७ अतिक्रमण पोलीस, ६ हायड्रॉलिक जेसीबी मशीन, ८ मजूर आणि ३ वाहन चालकांच्या साहाय्याने हे अनधिकृत बांधकाम अत्यंत प्रभावीपणे जमीनदोस्त करण्यात आले. अचानक झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

“शहरातील सार्वजनिक जागा, उद्याने, रस्ते आणि नागरिकांसाठी राखीव असलेली मोकळी मैदाने अतिक्रमणमुक्त ठेवणे ही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. सार्वजनिक जमिनी बळकावणाऱ्या अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात प्रशासन कोणतीही तडजोड करणार नाही. शहरातील सुजाण नागरिकांच्या सुरक्षिततेसह पिंपरी-चिंचवडच्या नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासासाठी अशा प्रकारच्या कडक कारवाया यापुढेही सातत्याने आणि अधिक प्रभावीपणे राबविल्या जातील.”

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!