news
मोशी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी पिंपरी मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; दोन बड्या अभियंत्यांची तडकाफडकी हकालपट्टीपिंपरी-चिंचवड मनपाच्या १० प्रभाग समित्यांवर नव्या कारभाऱ्यांची बिनविरोध निवड; प्रजित नायर यांनी पाहिले पीठासीन अधिकारी म्हणून कामअमरावती अंनिसच्या शहर अध्यक्षपदी मिलिंद तायडे; पाक्षिक सभेत जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा निर्धार‘वर्ल्डस्किल्स’ जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवण्याची हुकमी संधी; ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’ चा रणसंग्राम सुरूपिंपरी-चिंचवडमधील ऑटो क्लस्टरमधील परिषदेत सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न; माजी आमदार भालेराव यांच्या वक्तव्यावर दादासाहेब झोंबाडे संतप्त
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत बकरी ईदच्या पूर्वतयारीचा आढावा! नेहरूनगर येथील ‘डॉक पॉईंट’वर होणार कुर्बानीची तात्पुरती व्यवस्था

पिंपरीत बकरी ईदच्या पूर्वतयारीचा आढावा! नेहरूनगर येथील ‘डॉक पॉईंट’वर होणार कुर्बानीची तात्पुरती व्यवस्था

महापालिका, पोलीस प्रशासन आणि मुस्लिम संघटनांची ऑटो क्लस्टरमध्ये चर्चा; नेहरूनगर येथे कुर्बानीसाठी जागा निश्चित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , २१ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “बकरी ईद (ईद-उल-अजहा) सणाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे महापालिका, पोलीस आणि सर्व संबंधित विभागांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा. सणादरम्यान नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत नागरी सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची प्रशासनाने कडक दक्षता घ्यावी,” अशा स्पष्ट सूचना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. तसेच या पवित्र सणाचे धार्मिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी आणि नागरिकांनीही प्रशासनास संपूर्ण सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बकरी ईद सणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने पालिका प्रशासन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच शहरातील विविध मुस्लिम धार्मिक व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते.

या महत्त्वपूर्ण समन्वय बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, सुनीलदत्त नरोटे, विजयसिंह भोसले, महेश कावळे उपस्थित होते. यासोबतच विशेष अधिकारी किरण गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळमहेंद्र कदम उपस्थित होते.

धार्मिक व व्यापारी संघटनांच्या वतीने कुरेशी जमात व्यापारी संघटनेचे युसूफ कुरेशी, गफूर कुरेशी, जमील कुरेशी, शकील कुरेशी, मौलाना तनवीर, मौलाना फल्जेहक, सबिर कुरेशी, करीम कुरेशी, अकबर कुरेशी, तायपाज कुरेशी, ईर्शाद कुरेशी, शफिक काझी आणि ऐफाज कुरेशी आदी प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देताना उप आयुक्त संदीप खोत यांनी सांगितले की, कुर्बानीसाठी मागील वर्षाप्रमाणेच यंदाही नेहरूनगर येथील ‘डॉक पॉईंट’ची (Dock Point) जागा निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने या तात्पुरत्या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी खालील आवश्यक सुविधा पुरवल्या जाणार आहेत.  तात्पुरते पत्राशेड, भव्य मंडप आणि चोवीस तास पुरेसा पाणीपुरवठा. मोबाईल टॉयलेट व्हॅन, स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि कचरा संकलनासाठी स्वतंत्र वाहने. जनावरांसाठी स्वतंत्र जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच जादा पाण्याच्या पुरवठ्यासाठी पाण्याचे टँकर आणि हौदांची विशेष व्यवस्था.

कुर्बानीनंतर निर्माण होणारा जैविक कचरा (वेस्ट) तात्काळ उचलण्यासाठी महापालिकेची विशेष पथके तीनही शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून, परिसरात दुर्गंधी पसरणार नाही याची काळजी घेतली जाईल. सुरक्षेच्या व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

बैठकीदरम्यान उपस्थित विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. यामध्ये ईदच्या काळात पाणीपुरवठा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे, जनावरे बाजारासाठी व बांधण्यासाठी किमान तीन ते चार दिवस आधीपासूनच अतिरिक्त जागा खुली करणे, तसेच मंडप व पत्राशेड परिसरात सातत्याने जंतुनाशक फवारणी करून स्वच्छता राखण्याची मागणी करण्यात आली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संघटनांच्या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेत, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या मुख्य अभियंत्यांना व अधिकाऱ्यांना दिले.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!