news
पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील पीडितांना ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंचा’चा भक्कम आधार; विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी फुंकरले दुःख!नगरसेवक श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यांच्या पाठपुराव्याला यश; गजानन नगर व ABC कॉलनीतील वीज समस्या सुटली!चऱ्होली बुद्रुक येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला पालकांचा उदंड प्रतिसाद; २५० हून अधिक बालकांना सुरक्षा कवच!अमरावतीत राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अंनिस’ शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे!शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर कडून अमरावती विभागात शाळांचा आढावा; शिल्लक निधीतून अभ्यासिका व संगणक सुविधा उभारण्याचे निर्देश!
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील पीडितांना ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंचा’चा भक्कम आधार; विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी फुंकरले दुःख!

पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्रकरणातील पीडितांना ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंचा’चा भक्कम आधार; विधानसभा उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांनी फुंकरले दुःख!

मृतकांच्या पत्नींना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार आणि मुलांच्या पहिलीपासून ते उच्च शिक्षणाची फी व संपूर्ण खर्च उचलणार; नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, स्वाती काटे व प्रतीक्षा लांघी यांच्या उपस्थितीत कौटुंबिक पुनर्वसनाचा मोठा निर्णय | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विषारी दारू प्रकरणातील बाधित कुटुंबांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणार; आमदार अण्णासाहेब बनसोडे आणि अण्णासाहेब बनसोडे युवा मंचाचे ॲड.अतिश लांडगे पीडित कुटुंबांना मोठा दिलासा

 

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, २८ जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड परिसरातील अत्यंत दुर्दैवी अशा विषारी दारू प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना न्याय आणि भक्कम आधार देण्यासाठी ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंच’ व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे,स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्ण ताकदीने सरसावले आहेत. या दुःखद घटनेमुळे ज्या कुटुंबांनी आपला कर्ता पुरुष गमावला आहे, अशा बाधित कुटुंबांचे पालकत्व स्वीकारून त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा ठाम निर्धार प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि सामाजिक नेते अ‍ॅड. अतिश लांडगे यांनी व्यक्त केला.

या पीडित कुटुंबांना केवळ तात्पुरती आर्थिक मदत न करता, त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व स्थिर करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे व

← Back

Thank you for your response. ✨

अ‍ॅड. अतिश लांडगे यांच्या विशेष पुढाकाराने आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अ‍ॅड. अतिश लांडगे यांनी सर्व बाधित कुटुंबीयांशी अत्यंत संवेदनशीलतेने सविस्तर संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी, कौटुंबिक व्यथा आणि भविष्यातील गरजा समजून घेत त्यांना धीर दिला.

पीडित कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अ‍ॅड. अतिश लांडगे यांनी बैठकीमध्ये उपस्थित योग्य त्या शासकीय व सामाजिक यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. या अंतर्गत मृत व्यक्तींच्या पत्नींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तातडीने सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ न देणे आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व शासकीय मदत विनाविलंब मिळवून देण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले.

याशिवाय, ‘अण्णासाहेब बनसोडे युवा मंच’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सर्व बाधित कुटुंबातील मुलांच्या पहिलीपासूनच्या पुढील उच्च शिक्षणासाठी लागणारी सर्व शैक्षणिक मदत, फी व इतर साहित्य मंचाच्या वतीने पुरविण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. पीडित कुटुंबीयांना न्याय, आधार आणि पुन्हा उभे राहण्याची ताकद देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही अ‍ॅड. अतिश लांडगे यांनी दिली.

बाधित कुटुंबांना आधार देण्यासाठी आयोजित केलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला विधान परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार अण्णासाहेब बनसोडे,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, स्थानिक नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, नगरसेविका प्रतीक्षा लांघी, अ‍ॅड. अतिश लांडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अ‍ॅड. अतिश लांडगे यांनी घेतलेल्या या संवेदनशील पुढाकारामुळे आणि अण्णासाहेब बनसोडे युवा मंचाच्या मदतीमुळे या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबांना मोठा मानसिक व सामाजिक दिलासा मिळाला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!