news
पिंपरी-चिंचवड महापालिका वारीसाठी सज्ज! महापौर रवी लांडगे यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी; संवेदनशील भागात उभारणार ‘वॉच टॉवर’पीसीएमसी मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात ‘ॲक्शन मोड’मध्ये! ३५ हजार आसामींना नोटीस; ऑनलाइन भरणा केल्यास ४ टक्के सवलतपिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा ड्रग्जमाफियांना मोठा दणका! १५६ गुन्ह्यांतील कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जाळून केला खाकपिंपरी-चिंचवडमध्ये बिल्डरांची मुजोरी! जाधववाडीत ‘संकेश्वर कॅपिटल’ची भिंत कोसळल्याने नागरिक गंभीर जखमी; संतप्त जमावाकडून वाहनांची तोडफोड!फळबागायतदारांसाठी मोठी बातमी! मृग बहार फळपीक विम्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; जाणून घ्या अंतिम तारखा आणि प्रति हेक्टर हप्ता
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा ड्रग्जमाफियांना मोठा दणका! १५६ गुन्ह्यांतील कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जाळून केला खाक

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा ड्रग्जमाफियांना मोठा दणका! १५६ गुन्ह्यांतील कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जाळून केला खाक

अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि रोहिदास पवार यांच्या उपस्थितीत रांजणगाव येथे वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट; शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिसांचे पाऊल | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; १५६ गुन्ह्यांतील २ कोटी ६४ लाखांचे अंमली पदार्थ भट्टीमध्ये जाळून नष्ट!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , ३० जून २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS Act) दाखल असलेल्या तब्बल १५६ गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा साठा आज शासनाच्या कडक नियमांनुसार प्रत्यक्ष भट्टीमध्ये जाळून पूर्णपणे नष्ट (Drug Disposal Drive) करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची एकूण किंमत तब्बल २ कोटी ६४ लाख १३ हजार ७१० रुपये एवढी आहे.

गांजा: ३१५ किलो ग्रॅम, एम.डी. (Mephedrone): ७६१ ग्रॅम, अंमली अफूची झाडे: १२ किलो, ब्राउन शुगर: ३०० ग्रॅम, डुडा (Doda): १०९ किलो, एकूण किंमत: ₹ २,६४,१३,७१०/-  केंद्रीय वित्त मंत्रालय, महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने दिलेल्या विशेष राजपत्र आणि मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी एका उच्चस्तरीय ड्रग्ज विल्हेवाट समितीची (Drug Disposal Committee) स्थापना करण्यात आली होती.

या समितीचे अध्यक्ष अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सदस्य तथा पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १) संदीप आटोळे यांच्या थेट उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. ३० जून रोजी या समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) पुणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अधिकृत प्रतिनिधी रांजणगाव एम.आय.डी.सी. येथील ‘महाराष्ट्र एन्व्हायरॉ पॉवर लिमिटेड’ (Maharashtra Enviro Power Ltd, Plot No. P-56) येथे प्रत्यक्ष हजर राहिले. या सर्वांच्या देखरेखीखाली वैज्ञानिक पद्धतीने भट्टीमध्ये हे अंमली पदार्थ जाळून खाक करण्यात आले.

सदरची अत्यंत गोपनीय व संवेदनशील कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १) संदीप आटोळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे २) प्रवीण बा. मोरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेचे प्रत्यक्ष नियोजन अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकुर तांबोळी, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर मुळे, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, तसेच पोलीस शिपाई संतोष स्वामी, रणधीर माने, कपिलेश इगवे, चंद्रकांत जाधव, संतोष सपकाळ आणि गोविंद डोके यांनी केले असून, या सर्व पथकाचे पोलीस वर्तुळात आणि नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

शहराला ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून यापुढेही अशाच प्रकारची कडक पावले उचलली जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!