news
Home पिंपरी चिंचवड खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवशी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम; ‘रेणुका शिशुगृहात’ मदत वाटप

खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवशी पिंपरी-चिंचवड काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम; ‘रेणुका शिशुगृहात’ मदत वाटप

शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली अनाथ व नवजात बालकांसाठी साहित्याचे वाटप; काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसतर्फे सामाजिक उपक्रम; रेणुका शिशुगृहातील बालकांना औषधे व पौष्टिक आहाराचे वाटप!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्षण प्रधान , २२ जुलै २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवा उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांतर्गत चऱ्होली वडमुखवाडी येथील ‘श्री रेणुका महाजन ट्रस्ट’ संचलित ‘रेणुका शिशुगृह’ येथे अनाथ व उपेक्षित बालकांसाठी आवश्यक औषधे आणि पौष्टिक आहाराचे मोफत वाटप करण्यात आले.

चऱ्होली येथील या शिशुगृहामध्ये बेवारस सापडलेली, पोलीस कारवाईद्वारे मिळालेली तसेच पुनर्वसनाची गरज असणारी अबोध बालके व लहान मुलांचे संगोपन केले जाते. सध्या या ठिकाणी ६ वर्षांपर्यंतच्या २० बालकांचा सांभाळ केला जात असून, यात अवघ्या १५ दिवसांच्या दोन नवजात बालकांचाही समावेश आहे. या सर्व बालकांसाठी आवश्यक असणारे साहित्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संस्थेकडे सुपूर्द केले.

नवजात बालकांसाठी आवश्यक औषधे व डायपर्स, पौष्टिक आहार, बिस्किटे व दलिया, शुद्ध गायीचे तूप व दूध पावडर हे सर्व साहित्य संस्थेच्या प्रतिनिधी रंजना शिंदे आणि पूनम खेडेकर यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.

रेणुका शिशुगृह हे अधिकृत ‘शिशुदत्तक गृह’ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लहान मुलांचे ६ वर्षांपर्यंत अतिशय प्रेमाने संगोपन केले जाते. या कालावधीत अनेक नागरिक कायदेशीर प्रक्रियेद्वारे बालकांना दत्तक घेतात, तर ६ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांना इतर मान्यताप्राप्त संस्थांमध्ये पुढील शिक्षणासाठी हस्तांतरित केले जाते.

या सेवाभावी उपक्रमाच्या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दीर्घायुष्यासाठी व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेसचे माजी सरचिटणीस हरीश डोळस, हिराचंद जाधव, विल्यम साळवी, सदाशिव तळेकर, कुणाल भोसले यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर काँग्रेसच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!