news
Home पिंपरी चिंचवड ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचा अरुण चाबुकस्वार यांच्याकडून पुनरुच्चार

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाचा अरुण चाबुकस्वार यांच्याकडून पुनरुच्चार

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजलीआमदार शंकरभाऊ जगताप अन् अश्विनीताई जगताप यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती; विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व बक्षीस वितरण | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संस्थापक अरुण चाबुकस्वार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; विविध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे , दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड: शिक्षणाच्या माध्यमातून उज्वल पिढी घडवण्याचे व्रत घेतलेल्या न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात, विविध शैक्षणिक उपक्रमांनी आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अत्यंत आदराने करण्यात आली. यावेळी ‘संकल्प पुष्पमाला अर्पण समिती’चे सदस्य विशेषत्वाने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले:

“भगवान बुद्धांनी मानवाला प्रज्ञा, करुणा आणि समता ही महान त्रिसूत्री दिली आहे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला आहे. हाच संदेश अंगीकारून विद्यार्थ्यांनी जीवनात पुढे गेले पाहिजे.”

त्यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला.

वाढदिवसानिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून प्रोत्साहित करण्यात आले.

शाळेतील मुली व शिक्षिकांनी अरुण चाबुकस्वार सर यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात आवडीने केक कापून संस्थापकांचे जंगी स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.

अरुण चाबुकस्वार यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत विविध क्षेत्रांतील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. मा. आमदार शंकरभाऊ जगताप, मा. आमदार अश्विनीताई जगताप, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेवक सागर कोकणे,  जितेश जगताप, बाळासाहेब शेंडगे, भाऊसाहेब गर्जे, तात्या शिनगारे, निलेश भिसे, सिद्धार्थ गायकवाड, हर्षवर्धन कांबळे, प्रमोद गायकवाड, किरण लोंढे, कुणाल साठे, सुनंदा गायकवाड या कार्यक्रमास शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुण चाबुकस्वार यांच्या शिक्षण क्षेत्रातील निष्ठावान कार्यामुळे समाजातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!