news
Home अमरावती प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश; अभ्यासासोबतच सामाजिक व शैक्षणिक चळवळींत बजावली सक्रिय भूमिका

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश; अभ्यासासोबतच सामाजिक व शैक्षणिक चळवळींत बजावली सक्रिय भूमिका

अमरावतीचे नाव दिल्लीत उंचावले; वैभव अभ्यंकर यांच्या यशाबद्दल कुटुंबिय अन् मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिल्ली विश्वविद्यालयातून एलएलबी पदवी संपादन; अमरावतीच्या वैभव अभ्यंकर यांचा प्रेरणादायी ‘गल्ली ते दिल्ली’ यशप्रवास!

अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: अमरावती येथील राहुलनगरचे रहिवासी वैभव अभ्यंकर यांनी भारतातील सर्वोच्च व नामांकित दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) सन २०२३ ते २०२६ या कालावधीत एलएलबीची (LLB – विधी पदवी) परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण करून पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संपूर्ण अमरावती शहरासह सामाजिक व शैक्षणिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित संसाधने आणि विविध कौटुंबिक व सामाजिक आव्हानांचा सामना करत वैभव अभ्यंकर यांनी जिद्द, चिकाटी आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांचा हा ‘गल्ली ते दिल्ली’ असा खडतर व प्रेरणादायी प्रवास उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक ग्रामीण व शहरी तरुणांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि आदर्श ठरत आहे.

दिल्लीमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्थेचे शिक्षण घेत असताना त्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासापुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या जागरूक, अभ्यासू आणि समाजाभिमुख विद्यार्थ्याची भूमिका बजावत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर उठलेल्या आंदोलनांमध्ये तसेच सामाजिक-शैक्षणिक चळवळींमध्ये हिरिरीने व सक्रिय सहभाग नोंदवला.

वैभव यांच्या या यशाबद्दल त्यांच्या आजी गोकर्णबाई वकीलराव अभ्यंकर, जिजा वसंतराव तसरे, वडील दादा अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, आई वंदना दादा अभ्यंकर आणि वीणा अभ्यंकर यांनी त्यांचे विशेष कौतुक करून त्यांना पुढील उज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच परिसरातील नामांकित आणि वरिष्ठ नागरिक इंजि. सुशील गुडदे, इंजि. संजय ढवळे, नितीन आठवले (फार्मासिस्ट), इंजि. अनिल बागडे,  पोलीस निरीक्षक राहुल तसरे, पोलीस निरीक्षक अतुल इंगोले,  प्रा. अरुणा तसरे (राऊत), विजय दांडगे सर, सतीश दादा गवई, कलेश कांबळे, राजेंद्र गवई, सिद्धार्थ गुडदे, विजय वानखडे, मोहन इंगळे, रुपेश सरदार, देवेन ढोके, अमोल अडेकार, विजय लव्हाळे, सचिन बनसोड, सागर वानखडे, चेतन अभ्यंकर यांच्यासह मानवता बुद्ध विहार आणि राहुलनगर परिसरातील नागरिकांनी वैभव अभ्यंकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. वैभव अभ्यंकर यांचे हे यश अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून त्यांच्या या यशोगाथेमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि कायद्याच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवी दिशा व प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!