news
‘सेंट्री चाळीतील गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही’; वाकडकर असोसिएटच्या SRA प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी!वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या ‘CIRT’ संस्थेचे ६० व्या वर्षात पदार्पण; हीरक महोत्सवी वर्षात राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन!पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध गुन्ह्यांची नोंद; किवळे येथे भीषण अपघातात एकाचा मृत्यू!सीसीटीव्ही अन् गुप्त बातमीदाराच्या जाळ्यात अडकला घरफोड्या; शेलपिंपळगाव चोरी प्रकरणी अहिल्यानगर येथून आरोपी जेरबंद!ग्रामीण भागात सीसीटीव्ही नसताना पिंपरी पोलिसांचा दिल्लीपर्यंत माग; २ हजार रुपयांच्या वादातून झालेल्या खुनाचा पर्दाफाश!
Home पिंपरी चिंचवड ‘सेंट्री चाळीतील गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही’; वाकडकर असोसिएटच्या SRA प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी!

‘सेंट्री चाळीतील गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही’; वाकडकर असोसिएटच्या SRA प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी!

भाजी विक्रेते अन् रहिवाशांच्या जीवाला धोका; शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख युवराज दाखले आक्रमक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी भाजी मंडई शेजारील सेंट्री चाळ येथील नियमबाह्य SRA प्रकल्पाला तातडीने स्थगिती द्या: लोकसेवक युवराज दाखले यांची मागणी

 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी भाजी मंडई शेजारील सेंट्री चाळ परिसरात वाकडकर असोसिएट मार्फत सुरू असलेला SRA (झोपडपट्टी पुनर्वसन) प्रकल्प हा पूर्णपणे नियमबाह्य पद्धतीने, सर्व नियम पायदळी तुडवून सुरू आहे. या बेकायदेशीर बांधकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी, अशी जोरदार मागणी शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी एसआरए (SRA) प्रशासनाकडे केली आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक भाजी विक्रेते, दुकानदार आणि सेंट्री चाळीतील रहिवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाया खोदण्याचे काम सुरू असताना शेजारील इमारतींना मोठ्या प्रमाणावर तडे जात असून, एफएसआय (FSI), पर्यावरण आणि महापालिकेच्या कोणत्याही आवश्यक परवानग्या न घेताच हे बांधकाम चालवले जात आहे. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांवर उघडपणे आणलेला गदा आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले की, “जसा बहुजन समाजाचा, प्रामुख्याने मातंग समाजाचा राजकीय वापर लोकप्रतिनिधींनी आजवर केला, तसाच प्रकार आता पिंपरीतील गरीब नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरवून केला जात आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. क्रांतीवीर लहुजी वस्ताद आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार जपणारा आमचा समाज अन्यायाविरुद्ध नेहमीच सक्षमपणे लढत आला आहे.”

या बेकायदेशीर प्रकल्पाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषी बिल्डरवर कडक स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या बांधकामाला पूर्णतः स्थगिती देण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दाखले यांनी या प्रसंगी दिला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!