news
‘सेंट्री चाळीतील गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही’; वाकडकर असोसिएटच्या SRA प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी!वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या ‘CIRT’ संस्थेचे ६० व्या वर्षात पदार्पण; हीरक महोत्सवी वर्षात राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन!पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध गुन्ह्यांची नोंद; किवळे येथे भीषण अपघातात एकाचा मृत्यू!सीसीटीव्ही अन् गुप्त बातमीदाराच्या जाळ्यात अडकला घरफोड्या; शेलपिंपळगाव चोरी प्रकरणी अहिल्यानगर येथून आरोपी जेरबंद!ग्रामीण भागात सीसीटीव्ही नसताना पिंपरी पोलिसांचा दिल्लीपर्यंत माग; २ हजार रुपयांच्या वादातून झालेल्या खुनाचा पर्दाफाश!
Home मुख्यपृष्ठ वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या ‘CIRT’ संस्थेचे ६० व्या वर्षात पदार्पण; हीरक महोत्सवी वर्षात राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन!

वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या ‘CIRT’ संस्थेचे ६० व्या वर्षात पदार्पण; हीरक महोत्सवी वर्षात राष्ट्रीय कार्यशाळांचे आयोजन!

अत्याधुनिक 'वाहन सायबर सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेचे' होणार उद्घाटन; संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते CIRT च्या हीरक महोत्सवी वर्षाचा औपचारिक प्रारंभ व बोधचिन्हाचे अनावरण!

पिंपरी / नागपूर प्रतिनिधी, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / नागपूर: केन्द्रीय रस्ते वाहतूक संस्था अर्थात ‘सीआयआरटी’ने (CIRT) आपल्या स्थापनेच्या ६० व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले असून, २०२६-२७ हे वर्ष संस्था ‘हीरक महोत्सवी वर्ष’ म्हणून दिमाखात साजरे करणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या हीरक महोत्सवी वर्षाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. तसेच या प्रसंगी हीरक महोत्सवी वर्षाच्या विशेष बोधचिन्हाचे (लोगो) अनावरणही त्यांच्या हस्ते पार पडले.
‘सुरक्षित आणि संरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे’ ही मध्यवर्ती संकल्पना या बोधचिन्हाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. आगामी वर्षात रस्ते सुरक्षा, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, तांत्रिक नवकल्पना आणि भविष्यातील प्रगत वाहतूक प्रणाली यांवर सीआयआरटीचा विशेष भर असणार आहे.

सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेतली. पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी वर्षाच्या मुख्य सोहळ्याच्या उद्घाटनासाठी गडकरी यांना अधिकृत निमंत्रणपत्र व विशेष निमंत्रणिका प्रदान करण्यात आली.
या शिष्टमंडळात सीआयआरटीचे संचालक डॉ. देवेंद्र सिंह, तांत्रिक सचिवालयाचे प्रमुख शेखर ढोले, ऑटोमोटिव्ह सायबरसुरक्षेचे प्रमुख फारुख मखदूम आणि संशोधन व सल्लागार सेवेचे प्रमुख उमेश सूर्यवंशी यांचा समावेश होता.

हीरक महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यामध्ये विविध राष्ट्रीय आणि तांत्रिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये भव्य उद्घाटन सोहळा आणि वाहनांमधील परस्पर संवाद तंत्रज्ञानावरील (V2V Communications) राष्ट्रीय कार्यशाळा. अत्याधुनिक ‘वाहन सायबर सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेचे’ (Vehicle Cybersecurity Testing Lab) उद्घाटन. वाहन उत्पादकांसाठी विशेष चाचणी व प्रमाणन कार्यशाळा. विद्यार्थी व नवोदित व्यावसायिकांसाठी वाहन सायबर सुरक्षा कौशल्य विकास कार्यक्रम, तांत्रिक कार्यशाळा आणि ज्ञानमालिका. प्रवासी सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती अभियान आणि रस्ता सुरक्षा महिन्याचे उपक्रम. सीआयआरटीच्या ६० वर्षांच्या प्रवासात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा विशेष सन्मान.

 

१९६७ मध्ये स्थापन झाल्यापासून सीआयआरटीने भारतातील रस्ते वाहतूक क्षेत्रात वाहन चाचणी, प्रमाणन, संशोधन, सल्लागार सेवा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. या हीरक महोत्सवी वर्षाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत रस्ते वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नवीन उपक्रमांना गती दिली जाणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!