32
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय: शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल प्रमुख गुन्ह्यांचा संक्षिप्त वृत्तान्त (दिनांक १६ सप्टेंबर २०२६)
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान दिनांक १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
१. खुनाचा प्रयत्न (BNS कलम १०९ – पूर्वीचे भादवि कलम ३०७)
-
चाकण (दक्षिण) पोलीस ठाणे (गु.र.नं. १५७/२०२६):
-
घटना: नानेकरवाडी (चाकण) येथील ‘इक्रा एन्टरप्रायजेस’ स्क्रॅप गोडाऊनबाहेर डंपरचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून वाद घातला. आरोपी १) हरिदास रामकिसन फलबोले व २) लखन तातेराव आवले यांनी डंपर चालक महादेव शंकर सोळंके यास लोखंडी टॉमीने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले.
-
फिर्यादी: संकेत मच्छिंद्र जाधव (वय २४, रा. जाधववाडी, चिखली).
-
तपास अधिकारी: मपोउपनि किंकर / पोउपनि मोले.
-
-
पिंपरी पोलीस ठाणे (गु.र.नं. ७६८/२०२६):
-
घटना: बौद्धनगर झोपडपट्टी, पिंपरी येथे चारित्र्याच्या संशयावरून चालू असलेल्या कौटुंबिक वादातून आरोपी आकाश अनिल खंडागळे (वय ३२) व इतर दोन महिला आरोपींनी संगनमत करून दीपक नामक तरुणाला शिवीगाळ व मारहाण केली. आरोपी आकाशने लोखंडी हातोडीने दीपकच्या डोक्यात, तोंडावर व छातीवर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींना अटक करण्यात आली आहे.
-
फिर्यादी: ३० वर्षीय महिला (रा. बौद्धनगर, पिंपरी).
-
तपास अधिकारी: पोउपनि केणे / सपोनि अतिये.
-
-
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे (गु.र.नं. ६३७/२०२६):
-
घटना: संजय गांधीनगर (मोशी) येथे घरगुती वादातून आरोपी संजय त्र्यंबक रगडे (वय ३५) याने सासवांसोबत वाद घालून किचनमधील लोखंडी कोयत्याने त्यांच्या डोक्यावर व हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
-
फिर्यादी: मयूर शिवाजी आदमाने (वय २४, रा. छत्रपती संभाजीनगर).
-
तपास अधिकारी: पोउपनि तळेकर / सपोनि पाटील.
-
२. अवैध शस्त्र बाळगणे व तडीपारी आदेशाचा भंग
-
हिंजवडी पोलीस ठाणे (गु.र.नं. ७३०/२०२६):
-
घटना: मारुंजी (ता. मुळशी) येथे सार्वजनिक रस्त्यावर आरोपी कुणाल चंद्रसेन गायकवाड (वय २६, रा. अजिंठानगरी, चिंचवड) हा २ वर्षांसाठी तडीपार असतानाही आणि शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असताना बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस बाळगताना मिळून आला.
-
फिर्यादी: पोलीस शिपाही मिनीनाथ पवार (हिंजवडी पो. ठाणे).
-
तपास अधिकारी: मपोउपनि पाटील / सपोनि साळी.
-
-
चाकण (उत्तर) पोलीस ठाणे (गु.र.नं. ८४८/२०२६):
-
घटना: जि. प. प्राथमिक शाळा, चिंचोशी (ता. खेड) च्या मागे आरोपी आकाश नवनाथ लोखंडे (वय १९, रा. चिंचोशी) हा बेकायदेशीररीत्या धारदार लोखंडी तलवार बाळगताना आढळल्याने त्यास अटक करण्यात आली.
-
फिर्यादी: पोलीस शिपाही शिवाजी लोखंडे.
-
तपास अधिकारी: पोउपनि बुरुठ / पोहवा गवारी.
-
-
रावेत पोलीस ठाणे (गु.र.नं. ४०३/२०२६):
-
घटना: रावेत येथील श्रेयश जेके इमारतीमागे आरोपी आदित्य व्यंकट शिर्के (वय २२) हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगून शस्त्रबंदी आदेशाचा भंग करताना मिळून आला.
-
फिर्यादी: पोलीस शिपाही संदीप गंगावणे (खंडणी विरोधी पथक).
-
तपास अधिकारी: श्रेणीपोउपनि बनसोडे / पोहवा श्रीकांत लांडगे.
-
३. प्राणघातक अपघात (BNS कलम १०६ – अपघात/मृत्यूस कारणीभूत)
-
देहूरोड पोलीस ठाणे (गु.र.नं. ३१६/२०२६):
-
घटना: के-टाऊन सोसायटी रोड, किवळे येथे आरोपी प्रतिक निळकंठ चांदेकर (वय २९, रा. वाल्हेकरवाडी) याने आपल्या एसपी शाईन दुचाकीने (MH 34 CA 8950) हयगयीने व भरधाव वेगात चालवून समोरून येणारे महादेव शिवपुत्र गावडे (वय ३६) यांच्या ॲक्टिव्हा (KA 51 EN 7494) गाडीला जोरात धडक दिली. या अपघातात महादेव गावडे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
-
फिर्यादी: ४४ वर्षीय महिला (मृताची चुलत बहीण, रा. घरकुल, चिखली).
-
तपास अधिकारी: सपोनि जेव.
-
-
पिंपरी पोलीस ठाणे (गु.र.नं. ७६५/२०२६):
-
घटना: मोरवाडी चौक ते नेपाळी मार्केट दरम्यान आरोपी वल्लभ नरेंद्र भोसले (वय ४०) याने आपली टाटा नेक्सॉन कार (MH 14 JU 8690) भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या स्विफ्ट कारला व उभ्या असलेल्या रिक्षाला (MH 14 LS 5472) धडक देऊन वाहनांचे नुकसान केले व फिर्यादीच्या बहिणीस (अदिती) जखमी केले.
-
फिर्यादी: श्रद्धा किशोर देशमुख (वय २९, रा. रुपीनगर, तळवडे).
-
तपास अधिकारी: परि. पोउपनि ज्योती काजळकर / पोहवा वारशिंगे.
-
४. घरफोडी, चोरी व मारहाण
-
आळंदी पोलीस ठाणे (गु.र.नं. ४५१/२०२६):
-
घटना: हनुमानवाडी, आळंदी-चाकण रोड येथील घर बंद असताना अज्ञात चोराने (संशयित: मयूर हरिश्चंद्र जाधव, रा. चिंबळी) घराचे कुलूप तोडून आतून ३,५०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
-
फिर्यादी: राजेंद्र खाशाबा पिसाळ (वय ५४, रा. बिजलीनगर, चिंचवड).
-
तपास अधिकारी: पोउपनि दुधमल / पोहवा वहील.
-
-
चाकण (उत्तर) पोलीस ठाणे (गु.र.नं. ८४६/२०२६):
-
घटना: चाकण येथील स्वाध हॉटेलसमोरील आगरकर ट्रान्सपोर्टच्या ऑफिससमोर उभ्या असलेल्या टाटा १०९ व टाटा १२१२ या दोन गाड्यांच्या ६०,००० रुपये किमतीच्या स्टेपनी अज्ञात चोरट्याने लांबवल्या.
-
फिर्यादी: जितेंद्र मारुती आगरकर (वय ५४, रा. चाकण).
-
तपास अधिकारी: पोउपनि कदम / पोहवा कोळेकर.
-
-
चिंचवड पोलीस ठाणे (गु.र.नं. ५०६/२०२६):
-
घटना: आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ आरोपी दिनेश अशोक ढोरे (वय ३४, रा. वडगाव मावळ) याने ओळखीच्या कारणावरून फिर्यादीस छातीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.
-
फिर्यादी: गणेश राजेंद्र तनपुरे (वय ४८, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशन).
-
तपास अधिकारी: पोउपनि बळीप / पोउपनि बारवकर.
-
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
