news
‘श्रम साफल्य योजनेतून १९ कर्मचाऱ्यांना हक्काचे घर अन् १७ जणांना नियुक्तीपत्रे’; पिंपरीत महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व उत्साहात!‘दुष्काळी भागात चारा छावण्या, मोफत पाणी अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तातडीने सुरू करा’; पिंपरीत सर्वपक्षीय संघटनांचे आंदोलन!‘चायनीज सायबर चोरांशी पार्टनरशिप करून चालवत होता काळा धंदा’; पिंपरी सायबर पोलिसांच्या জাळ्यात मास्टरमाइंड!‘सांस्कृतिक मूल्ये आणि गणेशोत्सवाची परंपरा जपणारा कौतुकास्पद उपक्रम’; राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने १२ व्या फोटो कॉन्टेस्टचे यशस्वी आयोजन!‘एआय, सायबर सुरक्षा आणि डेटा सेंटर सेवांमध्ये फिडेलची जागतिक भरारी’; सॉफ्टेंजरच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू!
Home पिंपरी चिंचवड ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!

‘अभिजात मराठी भाषा सप्ताह ही लोकचळवळ व्हावी’; पिंपरी महापालिकेच्या नियोजन बैठकीत महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!

ग्रंथप्रदर्शने, व्याख्याने अन् शालेय स्पर्धांचे आयोजन; नागरिक व साहित्यिकांकडून महापालिकेकडून लेखी सूचना आमंत्रित | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १६ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: मराठी भाषेचे वैभव अधिक समृद्ध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील सर्व घटकांना सोबत घेऊन भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यावर्षीच्या ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या (३ ते ९ ऑक्टोबर २०२६) निमित्ताने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी साहित्य, कला आणि संस्कृतीशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये शहरातील साहित्यिक, अभ्यासक, कलाकार आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार आयोजित या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि दिवसाच्या नियोजनासाठी प्राप्त झालेल्या सर्व योग्य व रचनात्मक सूचनांचा महापालिकेच्या वतीने निश्चितपणे अंतर्भाव केला जाईल. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन अधिक व्यापक व्हावे यासाठी महापालिका सातत्याने पुढाकार घेत राहील. परंतु, ही जबाबदारी केवळ महापालिकेपुरती मर्यादित नसून, त्यात शहरातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ही लोकचळवळ निरंतर पुढे चालू ठेवावी.”

 पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक साहित्यिकांची पुस्तके महापालिकेच्या ग्रंथालयांमध्ये समाविष्ट करावीत तसेच विविध कार्यक्रमांत भेट स्वरूपात देण्यासाठी त्यांच्या पुस्तकांना प्राधान्य द्यावे. महापालिकेच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्याने सहभागी करून घेण्यात यावे.  शाळांमध्ये अभिवाचन, निबंधलेखन, कथा-कविता लेखन, पत्रलेखन, म्हणी-वाक्प्रचार, उखाणे आणि कोडी स्पर्धांचे आयोजन करावे. तसेच विद्यार्थ्यांना शाहिरी परंपरा, लोककलांचे प्रशिक्षण आणि ‘लेखक आपल्या भेटीला’ यांसारखे उपक्रम राबवावेत. अभिजात मराठी भाषेतील प्राचीन व मौल्यवान ग्रंथांचे प्रदर्शन, अनुवादित पुस्तकांची विक्री, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद व कार्यशाळांचे आयोजन मध्यवर्ती ठिकाणी करण्यात यावे.  नोकरदार वर्गाला सहभाग घेता यावा यासाठी काही प्रमुख कार्यक्रम सायंकाळच्या वेळेत आयोजित करावेत.

 

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या आयोजनाबाबत नागरिक, साहित्यिक, लेखक, कवी, अभ्यासक व सामाजिक संस्थांनी आपल्या लेखी सूचना पिंपरी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील ‘माहिती व जनसंपर्क विभागात’ जमा कराव्यात किंवा pro@pcmcindia.gov.in या अधिकृत ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या नियोजन बैठकीस उप आयुक्त पंकज पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मोरवाडी) चे प्राचार्य शशिकांत पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, ग्रंथालय प्रमुख प्रतिभा मुनावत, ग्रंथपाल वर्षा जाधव, वैशाली थोरात यांच्यासह शहरातील बहुसंख्य साहित्यिक, कलाकार व संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये कल्पना क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, विजय न्यायाधीश, सविता इंगळे, संदीप तापकीर, शोभा जोशी, प्रदीप गायकवाड, सुनील भिसे, कवी डॉ. जयद्रथ आखाडे, किरण जोशी, प्रकाश निर्मळ, कैलास भैरट, शामला पंडित, सीमा गांधी, अशोक होनराव, प्रकाश ढवळे, आनंद यंक्रस, राजन लाखे, डॉ. संजय पवार, संभाजी बारणे, राजेंद्र कांकारिया, मनोज डाळीम्बकर, पंकज चव्हाण, सुहास जोशी, राजेंद्र बंग, राजेंद्र धारटे, विजय पानसरे, संदीप कर्नावट, विजय उलपे, अशोक सोनवणे, चंद्रकांत धस, अरुण बोऱ्हाडे, विजयकुमार पिरंगुटे, संतोष रासने, ज्ञानेश्वर घाडगे यांचा समावेश होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!