34
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार; भावूक वातावरणात निरोप सोहळा संपन्न!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०१ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ०४ पोलीस अधिकारी व अंमलदार नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम सोमवारी (दि. ३१ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ‘शिवनेरी हॉल’ येथे अत्यंत भावूक वातावरणात पार पडला.
सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार श्री. सुरेश भागुजी उगले (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय), श्री. अनिल बाबुराव देशमुख (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन), श्री. अशोक घनशाम परदेशी (श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन), श्री. शशिकांत बापुसाहेब कांबळे (पोलीस शिपाई २८७३, हिंजवडी पोलीस स्टेशन)

आयोजित कार्यक्रमात पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसह शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, झाडाचे रोपटे आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. पोलीस दलातील प्रदीर्घ आणि निष्ठेने केलेल्या सेवेबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत, अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उदंड आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या निरोप समारंभास कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड, सहायक पोलीस निरीक्षक राकेश भामरे यांच्यासह आयुक्तालयातील इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्तांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची माहिती पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे यांनी दिली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
