news
शिक्षण, कला अन् समाजकारणातील योगदानाबद्दल कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड मनपालिकेत भव्य सत्कार!‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!पिंपरी महापालिकेकडून ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत विशेष मोहीम; कचरा वर्गीकरणासाठी पथनाट्यांद्वारे प्रभावी प्रबोधन!‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘अपुऱ्या माहितीच्या आधारे अप्पूघरला मुदतवाढ नको’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे आयुक्तांना पत्र!

‘अपुऱ्या माहितीच्या आधारे अप्पूघरला मुदतवाढ नको’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे आयुक्तांना पत्र!

साहसी खेळ, सुरक्षा परवानग्या अन् तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वर्क ऑर्डर देण्यास विरोध; पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अप्पूघर अम्युजमेंट पार्क मुदतवाढीला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा तीव्र आक्षेप; आयुक्तांना दिले निवेदन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: शहरातील प्रसिद्ध असलेल्या ‘अप्पूघर अम्युजमेंट पार्क’च्या दीर्घ मुदतवाढ आणि नवीन उपक्रमांच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. या प्रकल्पाबाबतची संपूर्ण माहिती, नागरिकांच्या सुरक्षेचे उपाय आणि आगामी योजनांचे स्पष्टीकरण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मुदतवाढ किंवा वर्क ऑर्डर (कामाचे आदेश) देऊ नयेत, अशी ठाम मागणी भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न सिताराम काटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनेक वर्षांपूर्वी अप्पूघर अम्युजमेंट पार्क सुरू करण्यात आले होते. लहान मुलांच्या मनोरंजनात्मक खेळण्यांसह वॉटर पार्कसारख्या सोयीसुविधा येथे विकसित करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात हा प्रकल्प बंद असल्याने, स्थायी समितीकडून या प्रकल्पाला बंद कालावधीची दोन वर्षांची मुदतवाढ देण्यासह दीर्घ मुदतवाढ देण्याची शिफारस महापालिका सर्वसाधारण सभेकडे करण्यात आली आहे.
मात्र, याबाबत भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात (जावक क्र. ३१५/२०२६) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अप्पूघर प्रकल्पात नक्की कोणत्या नवीन उपक्रमांना मान्यता दिली जाणार आहे, याचे सादरीकरण शहरातील प्रमुख नेत्यांना, सर्व राजकीय पक्षांच्या मान्यवरांना व नागरिकांना होणे अत्यंत आवश्यक आहे.  प्रस्तावित प्रकल्पात कोणते साहसी खेळ असणार? कोणत्या नोंदणीकृत कंपन्यांचे प्रॉडक्ट्स (खेळणी) वापरले जाणार? या प्रकल्पाचे नियोजन आणि सल्लागार कोण आहेत? नागरिकांच्या व बालकांच्या जीवाची सुरक्षितता आणि सुरक्षात्मक परवानग्यांबाबत निश्चित धोरण काय? असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी विशेष आर्किटेक्ट, डिझायनर आणि या क्षेत्रातील अधिकृत संस्थांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही मंजुरी देऊ नये.

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पत्रात नमूद केले आहे की, “अप्पूघर हा प्रकल्प शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, नागरिकांची आणि चिमुकल्यांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण नियोजन, तांत्रिक बाबी आणि सुरक्षेची खात्री होत नाही, तोपर्यंत महापालिका प्रशासनाने या प्रकल्पास कोणतीही मुदतवाढ देऊ नये किंवा पुढील कार्यवाही करू नये.”
भाजप शहराध्यक्षांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अप्पूघर अम्युजमेंट पार्कच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावरून आगामी काळात महापालिका वर्तुळात मोठे वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!