news
शिक्षण, कला अन् समाजकारणातील योगदानाबद्दल कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड मनपालिकेत भव्य सत्कार!‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!पिंपरी महापालिकेकडून ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत विशेष मोहीम; कचरा वर्गीकरणासाठी पथनाट्यांद्वारे प्रभावी प्रबोधन!‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!

‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!

नवीन 'लोहगड' क्षेत्रीय कार्यालयाचे अद्ययावतीकरण अन् छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरासाठी रोषणाई प्रकल्पास हिरवा कंदील | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या पायाभूत सुविधा व नागरी सेवांच्या बळकटीकरणासाठी स्थायी समितीचा धडाका; विविध विकासकामांना मंजुरी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड:  शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य यंत्रणा आणि पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
या बैठकीत संगणक यंत्रणेची सायबर सुरक्षा, नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस मार्गाची दुरुस्ती, नव्याने स्थापन झालेल्या ‘लोहगड’ (ल) क्षेत्रीय कार्यालयाचे अद्ययावतीकरण, मनपा रुग्णालयांसाठी ऑर्थोपेडिक इमप्लांट्स खरेदी, आणि मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरासाठी विद्युत पुरवठा यांसारख्या अनेक जनहितैषी विषयांना हिरवा कंदील दाखवण्यात आला.

महापालिकेच्या संगणकीय प्रणालींच्या सुरक्षेसाठी ३ हजार अँटी-व्हायरस सिस्टीम खरेदी आणि पुढील ३ वर्षांसाठी तांत्रिक सपोर्ट स्टाफ नियुक्तीस मंजुरी.  नाशिक फाटा उड्डाणपुलाची दुरुस्ती, कॉरिडॉर क्र. ३ (नाशिक फाटा ते वाकड) रस्ता देखभाल आणि औंध-रावेत बीआरटीएस मार्गाच्या मूल्यांकनासह बसथांब्यांच्या दर्जा सुधारण्यास मान्यता. नव्याने कार्यान्वित ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयासाठी प्रभाग समिती सभागृह, अध्यक्ष केबिन, अधिकारी कक्ष, कॅश काउंटर व फर्निचर कामांना मंजुरी.  ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने’तील रुग्णांच्या हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी Orthopedic Implants खरेदी तसेच कान-नाक-घसा विभागातील Microdrill सिस्टीमच्या सर्वसमावेशक देखभालीला मान्यता. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरासाठी उच्चदाब विद्युतपुरवठा, आकर्षक LED फसाड लाईटिंग व CCTV प्रणाली विकसित करणार.  शिवार चौक ते गोविंद गार्डन चौक रस्त्यासाठी दोन्ही बाजूला अधिक क्षमतेच्या नवीन डी.आय. जलवाहिन्या टाकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी.बोपखेल, पांजरपोळ, दिघी, पिंपळे निलख, थेरगाव, वाकड-भगवाननगर, श्रीनगर, आकुर्डी, चिखली व कुदळवाडी परिसरातील टाक्या व जलवाहिन्यांच्या एकत्रित देखभाल-दुरुस्तीस मान्यता. शहरातील ३० डीपी रस्त्यांचे सुशोभीकरण व २ लाख देशी झाडांच्या लागवडीसाठी ५ अनुभवी उद्यान अधिकारी व ३ सहाय्यक अधिकाऱ्यांना ६ महिन्यांसाठी मानधनावर पुनर्नियुक्ती. ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ सात दिवस विस्तारित स्वरूपात आयोजित करण्यास मंजुरी.

“शहरातील नागरिकांना नियमित आणि सक्षम पाणीपुरवठा मिळणे, रस्ते व बीआरटीएस सुविधा सुस्थितीत राहणे आणि महापालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये आवश्यक उपचार साहित्य वेळेत उपलब्ध होणे याला आम्ही प्राधान्य दिले आहे. महापालिकेची डिजिटल सुरक्षा मजबूत करणे, नव्या क्षेत्रीय कार्यालयांतून अधिक प्रभावी सेवा देणे आणि शहराच्या वाढत्या गरजांनुसार पायाभूत सुविधा निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. प्रशासकीय कार्यक्षमता व नागरिकहित केंद्रस्थानी ठेवून स्थायी समिती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील.”
— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!