news
‘शहराचा खरा विकास कला अन् संस्कृतीतूनच’; भव्य पिंपरी-चिंचवड महोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!‘संगीत अकादमीतील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवण्यास प्राधान्य’; उपमहापौर शर्मिला बाबर यांचे प्रतिपादन!‘सरकारी रुग्णालयांतील निष्काळजीपणा खपवून घेणार नाही’; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यस्तरीय रुग्णालय सुरक्षा अभियानाची मागणी!‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’चा पिंपरी महापालिकेत फज्जा; सांगवी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई!पिंपरी-चिंचवडला आदर्श ‘शैक्षणिक हब’ बनवण्यासाठी ठोस पाऊल; ‘नो बॅग डे’सह कौशल्याधारित शिक्षणावर रिटा सानप यांचा भर!
Home पिंपरी चिंचवड ‘शहराचा खरा विकास कला अन् संस्कृतीतूनच’; भव्य पिंपरी-चिंचवड महोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!

‘शहराचा खरा विकास कला अन् संस्कृतीतूनच’; भव्य पिंपरी-चिंचवड महोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!

स्थानिक गुणवत्ता अन् बालकलाकारांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम; सांस्कृतिक विश्वात नवचैतन्याचे वातावरण | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडच्या कलागुणांना मिळणार हक्काचे ‘महोत्सावा’चे व्यासपीठ; महापौर रवी लांडगे यांच्या पुढाकाराने शहराच्या सांस्कृतिक चळवळीला मिळणार नवी दिशा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: औद्योगिक आणि आधुनिक शहर म्हणून वेगाने प्रगतीपथावर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता एक नवी व समृद्ध सांस्कृतिक ओळख मिळवून देण्यासाठी भव्य ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात येत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या सुप्त कलागुणांना शोधून त्यांना हक्काचे, भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महापौर तथा महोत्सवाचे स्वागताध्यक्ष रवी लांडगे यांच्या या दूरदृष्टीपूर्ण व अत्यंत संवेदनशील उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वात नवचैतन्य निर्माण झाले असून, महापौर रवी लांडगे यांची सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिमा कमालीची उंचावली आहे.
या महोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाचे मुख्य संयोजक तथा आमदार अमित गोरखे, मुख्य संयोजक तथा विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ कलाकार, सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात संगीत, नाट्य, नृत्य, लोककला, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात अफाट गुणवत्ता आहे. परंतु, योग्य व्यासपीठाअभावी अनेक कलाकारांची प्रतिभा दुर्लक्षित राहते. हीच उणीव ओळखून महापौर रवी लांडगे यांनी या महोत्सवात नामवंत कलाकारांसोबतच स्थानिक व नवोदित कलाकारांना, तसेच विशेषतः बालकलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतला आहे. नाट्य परिषदेच्या सहकार्याने बालनाट्य, मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य नियोजन केले जाणार आहे.

या प्रसंगी शहराच्या सांस्कृतिक समृद्धीचा संकल्प मांडताना महापौर रवी लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिभेची कोणतीही कमतरता नाही; गरज आहे ती केवळ या प्रतिभेला योग्य संधी आणि हक्काचे व्यासपीठ देण्याची. आपल्या शहरातील कलाकारांना सादरीकरणासाठी इतर शहरांकडे पाहावे लागू नये, अशी भक्कम सांस्कृतिक व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता, प्रत्येक कलाकार, विद्यार्थी, क्रीडापटू आणि कलाप्रेमी पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान व उत्सव बनेल.”
ते पुढे म्हणाले की, “शहराचा विकास हा केवळ रस्ते आणि इमारतींनी होत नाही, तर शहराची खरी ओळख तेथील कला, संस्कृती व परंपरांमधून आकाराला येते. पिंपरी-चिंचवडच्या या वैभवाला राज्य व देशपातळीवर एक स्वतंत्र, सन्मानजनक ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

महोत्सव अधिक लोकशाहीपूर्ण, सर्वसमावेशक आणि शहराच्या वैविध्याचे प्रतिनिधित्व करणारा व्हावा, याकरिता महोत्सवाचे मुख्य संयोजक आमदार अमित गोरखे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही आपल्या भावना व्यक्त करत, हा महोत्सव संपूर्ण शहराला एकत्र आणणारी सांस्कृतिक ताकद ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
गणेशोत्सवाच्या धर्तीवर आयोजित होणाऱ्या या ‘पिंपरी-चिंचवड गणेश महोत्सव २०२६’ मुळे नवोदित कलाकारांना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. महापौर रवी लांडगे यांच्या या जनहितकारी व कलाप्रेमी पुढाकारामुळे पिंपरी-चिंचवडचे नाव सांस्कृतिक पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरले जाणार असून, संपूर्ण शहरातून या महोत्सवाचे आणि महापौरांच्या नेतृत्वाचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!