29
आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डी डीवायपीसीओइ, तर मुलींच्या गटात रावेत पीसीसीओईआर अजिंक्य!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०७ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी / रावेत: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि रावेत येथील पीसीसीओईआर (PCCOER) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (DYPCOE) संघाने, तर मुलींच्या गटात रावेत येथील पीसीसीओईआर संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संघाने (मुलांचा गट) ताथवडे येथील इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स (ICCS) संघाचा पराभव करत चषक उंचावला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये डीवायपीसीओइ संघाने राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा, तर इंदिरा कॉलेजने पीसीसीओई (निगडी) संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.

अंतिम सामन्यात रावेत येथील पीसीसीओईआर संघाने (मुलींचा गट)आकुर्डी येथील पीसीसीओई संघावर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीत पीसीसीओईआरने पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आणि पीसीसीओई संघाने सासवडच्या पीडीइए कॉलेज ऑफ फार्मसीचा पराभव केला होता.
या स्पर्धेत मुलांच्या गटात पुणे जिल्ह्यातील एकूण १८ महाविद्यालयांचे, मुलांचा गट विजेता: आकुर्डी डीवायपीसीओइ (DYPCOE) , उपविजेता: ताथवडे आयसीसीएस (ICCS) , तृतीय क्रमांक: निगडी पीसीसीओई (PCCOE)
तर मुलींच्या गटात ८ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. मुलींचा गट विजेता: रावेत पीसीसीओईआर (PCCOER), उपविजेता: आकुर्डी पीसीसीओई (PCCOE), तृतीय क्रमांक: पिंपरी डीवायपीएसीएससी (DYPACSC)
स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. अक्षय काशीद, डॉ. गणेश चव्हाण आणि निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल कमलापुरे यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन पीसीसीओईआरचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मिलिंद थोरात यांनी केले.
विजेत्या व सहभागी संघांचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विशेष अभिनंदन केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
