news
Home पिंपरी चिंचवड ‘नागरिकांना अखंडित वीज मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील’; रहाटणीतील वीज प्रश्नावर बाबासाहेब त्रिभुवन आक्रमक!

‘नागरिकांना अखंडित वीज मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील’; रहाटणीतील वीज प्रश्नावर बाबासाहेब त्रिभुवन आक्रमक!

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रभागात पाहणी दौरा; आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला गती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

रहाटणी-तापकीर नगरमधील खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन मैदानात; महावितरण अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी अन् तातडीचे निर्देश!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

रहाटणी – तापकीर नगर:  प्रभागामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी माजी नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन हे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. जनसमस्यांची तत्परतेने दखल घेत त्यांनी कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण प्रभागातील नादुरुस्त वीज यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि वीज प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचे निर्देश दिले.

प्रभागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने घरून काम करणाऱ्या आयटी (IT) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम ठप्प होत होते. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर प्रतिकूल परिणाम होत असून व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या या मूलभूत समस्येचे गांभीर्य ओळखून जनसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर तरंगे आणि सहायक अभियंता सुनील कदम यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.

प्रभागातील धोकादायक व जुनी झालेली वीज यंत्रणा बदलण्यासाठी बाबासाहेब त्रिभुवन यांनी महावितरण प्रशासनाला अधिकृत पत्र दिले आहे. यात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे:
  • एलटी बॉक्स स्थलांतर: आदिनाथ कॉलनीतील खराब झालेला महावितरणचा एलटी (LT) बॉक्स नवीन बसवून तो सुरक्षित व योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा.
  • एचटी बॉक्सची तपासणी: प्रभागातील नादुरुस्त व खराब झालेले हाय-टेंशन (HT) बॉक्स तपासून ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे तात्काळ नवीन बॉक्स बसवण्यात यावेत.

केवळ पत्रावर न थांबता बाबासाहेब त्रिभुवन यांनी महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आदिनाथ कॉलनी, पुरंदर कॉलनी आणि समता कॉलनी परिसरातील वीज बॉक्सची प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या ठिकाणी जुने बॉक्स अपघाताला निमंत्रण देत आहेत किंवा वारंवार ट्रिपिंगचा त्रास देतात, तिथे तातडीने नवीन वीज बॉक्स बसवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

“नागरिकांना अखंडित वीज, पाणी आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे ही केवळ माझी प्रशासकीय जबाबदारी नसून माझे आद्य कर्तव्य आहे. रहाटणी-तापकीर नगर प्रभागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत महावितरण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या प्रत्येक समस्येसाठी मी असाच कायम प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत राहीन,” असा ठाम विश्वास नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी व्यक्त केला.
या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर तरंगे, सहायक अभियंता सुनील कदम, महावितरणचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते विकास येकशिंगे, प्रशांत कुंजीर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेब त्रिभुवन यांच्या या तत्पर आणि प्रत्यक्ष कृतीशील कार्यपद्धतीमुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!