news
पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर काशिनाथ नखाते यांचा प्रहार; उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निगडीत जल्लोष!‘महापौर निवासस्थान मध्यवर्ती भागात उभारा, प्राधिकरणातील जागा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच ठेवा’; पिंपरीत शिवप्रेमी आक्रमक!‘माहितीअभावी एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये’; पिंपरी पालिकेच्या समाज विकास विभागाचा मोठा निर्णय!भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना बसणार आळा; उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सहा विभागांतून मागवणार सूचना!महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय व बंदरांच्या विकासासाठी नितेश राणे आक्रमक; शरद पवारांशी मुंबईत चर्चा!
Home मुख्यपृष्ठ भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना बसणार आळा; उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सहा विभागांतून मागवणार सूचना!

भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना बसणार आळा; उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सहा विभागांतून मागवणार सूचना!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह ६ ठिकाणी बैठकांचे आयोजन; सुधारणांसाठी विभागीय ईमेलवर अभिप्राय नोंदवण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद; या महिन्यात राज्यातील ६ विभागांना देणार भेटी!

मुंबई / पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई / पिंपरी: राज्यातील सरकारी भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार उच्चस्तरीय टास्क फोर्स (Task Force) गठीत केला आहे. राज्यातील संपूर्ण भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सुधारणा सुचवण्यासाठी हा टास्क फोर्स चालू महिन्यात राज्यातील सर्व सहा प्रशासकीय विभागांना प्रत्यक्ष भेटी देणार आहे.
या दौऱ्यादरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित घटकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.
टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक:

पुणे विभाग (१२ सप्टेंबर २०२६)  स्थळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,

ई-मेल  pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नागपूर विभाग (१६ सप्टेंबर २०२६) स्थळ डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर,
ई-मेल  nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in

अमरावती विभाग (१७ सप्टेंबर २०२६): स्थळ: अमरावती,

ई-मे   amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in

छत्रपती संभाजीनगर विभाग (२१ सप्टेंबर २०२६) स्थळ: स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर,

ई-मेल  csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in

कोकण विभाग (२९ सप्टेंबर २०२६) स्थळ: चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई,
ई-मेल  konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in

नाशिक विभाग (३० सप्टेंबर २०२६) स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक,                                                                                             ई-मेल nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in

 

नागरिक आणि संबंधित घटक आपापल्या विभागाच्या दिलेल्या ई-मेल आयडीवर आपल्या लेखी सूचना व अभिप्राय पाठवू शकतात. या विभागनिहाय संवादातून आणि ईमेलद्वारे प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा टास्क फोर्स सखोल अभ्यास करेल.

या अभ्यासाच्या आधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालणे, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण करणे, प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि परीक्षा व्यवस्था अधिक सुटसुटीत व उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाला सविस्तर शिफारशी सादर केल्या जातील. भेटींची वेळ आणि सहभागाची प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!