news
Home पिंपरी चिंचवड पीसीयूच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधींची द्वारे उघडली; ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे मोलाचे योगदान!

पीसीयूच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधींची द्वारे उघडली; ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे मोलाचे योगदान!

उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याचे दशरथा एम. व वीरकुमार बीडे यांचे आवाहन; कुलगुरू डॉ. सोनावणे यांची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

विद्यार्थ्यांनी केवळ कोडिंगपुरते मर्यादित न राहता स्व-संकल्पना विकसित करावी: दशरथा एम.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०८ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: “योग्य उद्योग भागीदारी, सक्षम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. आज ऑटोमोबाईल क्षेत्रातील वेगाने होणारे बदल, रोबोटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, स्मार्ट सिटी, संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि एम्बेडेड सॉफ्टवेअर यांचे महत्त्व अथांग वाढले आहे. त्यामुळे आताच्या विद्यार्थ्यांनी केवळ कोडिंगपुरते मर्यादित न राहता स्वतःची स्व-संकल्पना आणि नाविन्यपूर्ण विचार विकसित करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ‘पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीस’चे प्रोग्राम डायरेक्टर दशरथा एम. यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) पिंपरी चिंचवड विद्यापीठात (PCU) पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीस आणि ब्लॅकबेरी क्यूएनएक्स यांच्या संयुक्त सहकार्याने “क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्स” (QNX RTOS Center of Excellence) चे दिमाखदार उद्घाटन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी एम्बेडेड सिस्टिम्स, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम (RTOS), ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, इंटेलिजंट मोबिलिटी आणि उद्योगांमधील अत्याधुनिक तांत्रिक प्रवाह या विषयांवर विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, पी स्क्वेअर टेक्नॉलॉजीसचे प्रोग्राम डायरेक्टर दशरथा एम., ब्लॅकबेरी क्यूएनएक्सचे डायरेक्टर वीरकुमार बीडे, विविध विभागांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना ब्लॅकबेरी क्यूएनएक्सचे डायरेक्टर वीरकुमार बीडे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी क्यूएनएक्स रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिमचे सखोल ज्ञान आत्मसात केले पाहिजे. सध्याच्या काळात आधुनिक ऑटोमोटिव्ह, मेडिकल डिव्हायसेस, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि सेफ्टी क्रिटिकल सिस्टिम्समध्ये या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. उद्योगांच्या या बदलत्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्यांत पारंगत झाले पाहिजे.”

पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “या सेंटर ऑफ एक्सलन्समुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी विद्यापीठ परिसरातच उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी या अत्याधुनिक संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.”
कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आणि समन्वयक डॉ. नीरू मलिक यांनी केले.
हे आयोजन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!