news
Home पिंपरी चिंचवड ‘चोरीची दुचाकी विकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आवळल्या मुसक्या’; चिखलीत सराईत गुन्हेगार जेरबंद!

‘चोरीची दुचाकी विकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी आवळल्या मुसक्या’; चिखलीत सराईत गुन्हेगार जेरबंद!

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; घरकुल व दापोडीतील चोरीचे गुन्हे उघड | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिखलीतील सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ३ कडून बेड्या; ३ दुचाकी जप्त, १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / चिखली: पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने धडक कारवाई करत सराईत वाहनचोरट्याला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या एकूण ३ दुचाकी गाड्या जप्त केल्या असून, चिखली आणि दापोडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता. दि. ०८ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अंमलदार अजित रुपनवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, चिखलीतील घरकुल परिसरामध्ये एक ऑन-रेकॉर्ड गुन्हेगार चोरीची दुचाकी आणून तिची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहे.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घरकुल परिसरात तातडीने सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीचे नाव जॉर्डन राजेश साळवे (वय २० वर्षे, रा. घरकुल, चिखली, पुणे).

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे होंडा ॲक्टिव्हा मोपेड (MH 14 FQ 1683) बाबत विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवून विश्वासात घेऊन चौकशी केली असता, ही गाडी घरकुल येथून चोरल्याची कबुली त्याने दिली.
त्यानंतर अधिक तपासात त्याने रुपीनगर येथून काळया रंगाची हिरो स्प्लेंडर (MH 14 GZ 1237) आणि दापोडी परिसरातून आणखी एक स्प्लेंडर गाडी रात्रीच्या वेळी लांबवल्याची कबुली दिली.
उघडकीस आलेले दाखल गुन्हे
१) चिखली पोलीस ठाणे: गु.र.नं. ५७०७/२०२६ (BNS ३०३ (२)) , २) चिखली पोलीस ठाणे: गु.र.नं. ६१९/२०२६ (BNS ३०३ (२)) , ३) दापोडी पोलीस ठाणे: गु.र.नं. २५९/२०२६ (BNS ३०३ (२))

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक गोसावी, जावळे, तसेच पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, स्वप्निल महाले, अजित रुपनवर, तुषार वराडे आणि दिलीप राठोड यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!