37
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन!
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १० सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: “राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रजेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवत न्याय, प्रशासन आणि सामाजिक सुधारणांना सर्वोच्च महत्त्व दिले. सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती आजही आदर्श मानली जाते. महिला नेतृत्व, लोककल्याण आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला असून त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी (पिंपरी) येथील स्मारकास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

या सोहळ्यास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पडळकर, लक्ष्मण रुपनर, मुकुंद कुचेकर, दीपक भोजने, राहुल मदने, सोनाताई गडदे, भुजंग दुधाळे, माणिकराव बारगळ, शंकर दातीर, गणेश एकल, जयंत वायकुळे, रवींद्र कंकरे, सतीश खरात, वंदना धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.

दुसरीकडे सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
“अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि लोकसेवेचे उत्तम उदाहरण आहे. राज्यकारभार करताना त्यांनी प्रजेच्या सुख-दुःखाला प्राधान्य दिले. त्यांचे कार्य केवळ एका कालखंडापुरते मर्यादित नसून येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी दीपस्तंभ ठरणारे आहे.”— भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.
या वेळी ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, प्रभाग अधिकारी संतोष कोराड, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष सचिन सरक, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गोफणे, अभिमन्यू गाडेकर, अजय दूधभाते, नवनाथ बीडे, छगन वाघमोडे, कृष्णराव गिरगुणे, संदिपान सामसे, रमेश गाढवे, गिरीश देवकाते, ज्ञानेश्वर मडबळ, प्राध्यापक गलांडे सर, बळीराम घोडके, महेंद्र लंबाते, नारायण भुरे, वाघमारे सर, अक्षय तिघाडे, भास्कर गाडेकर, अरविंद टेकाळे व हरिश्चंद्र गायके उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
