news
Home अमरावती ‘मेळघाटात वैज्ञानिक दृष्टिकोन अन् विवेकवादी विचार रुजवणार’; अंबाजोगाईतील बैठकीत ‘अंनिस’चा महत्त्वपूर्ण निर्णय!

‘मेळघाटात वैज्ञानिक दृष्टिकोन अन् विवेकवादी विचार रुजवणार’; अंबाजोगाईतील बैठकीत ‘अंनिस’चा महत्त्वपूर्ण निर्णय!

अमरावती जिल्हा शाखेच्या उपक्रमांचे राज्य कार्यकारिणीकडून कौतुक; संघटनात्मक बळकटीकरणावर भर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीत अमरावती जिल्ह्याचा चार महिन्यांचा कार्यअहवाल सादर!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. १२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अंबाजोगाई (बीड) / अमरावती: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बीड जिल्ह्यातील मानवलोक समाजकार्य महाविद्यालय (अंबाजोगाई) येथे आज पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीलाच अंनिसच्या अमरावती जिल्हा शाखेचा जून २०२६ ते सप्टेंबर २०२६ या चार महिन्यांचा सविस्तर कार्यअहवाल राज्य कार्यकारिणीसमोर सादर करण्यात आला.
या कार्यअहवालाचे वाचन, मांडणी व प्रभावी सादरीकरण अमरावतीचे जिल्हाकार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले. या वेळी अमरावतीचे जिल्हा प्रधानसचिव विजय डवरे प्रमुख उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील विविध शाखांच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवालात सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने  समाजात पसरलेल्या भाकड कथा आणि अंधश्रद्धांविरोधात प्रबोधन,  युवक आणि नागरिकांमध्ये सनदशीर मार्ग व संविधानात्मक मूल्यांची रुजवणूक.  जिल्हाभरात कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करणे आणि उपक्रमांची व्याप्ती वाढवणे.

बैठकीत अमरावती जिल्ह्यातील कामांचे कौतुक करण्यात आले असून आगामी काळातील नियोजित उपक्रमांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम आदिवासी भागात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी जनजागृतीचे कार्यक्रम अधिक प्रभावी व आक्रमकपणे राबविण्याबाबत राज्य कार्यकारिणीने सकारात्मक निर्णय घेतले.
राज्य कार्यकारिणीच्या या बैठकीमुळे आगामी काळात अमरावती जिल्ह्यातील शाखा बळकटीकरण, कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे आणि उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी ठोस दिशा मिळाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!