news
‘सरकारी नोकरीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, भामट्यावर गुन्हा दाखल!‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!‘नागरिकांना त्रास न होता पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने कचऱ्याची विल्हेवाट लावणार’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!‘कृषी पर्यटनातून साधणार ग्रामीण विकास अन् महिला सक्षमीकरण’; पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांचे प्रतिपादन!‘महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमा डागाळणारे अश्लील प्रकार खपवून घेणार नाही’; पुणे प्रशासनाच्या कारवाईनंतर टीना शर्मा घेवारे आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘कॉपर चोरांच्या टोळीचा मास्टरप्लॅन गुन्हे शाखेने उधळला’; १९.८४ लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांना रंगेहात पकडले!

‘कॉपर चोरांच्या टोळीचा मास्टरप्लॅन गुन्हे शाखेने उधळला’; १९.८४ लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांना रंगेहात पकडले!

गुप्त बातमीदार अन् CCTV फुटेजच्या आधारे युनिट ४ ची कारवाई; तळेगाव, चिखली अन् देहूरोडमधील ९ गुन्ह्यांची उकल | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ ची धडाकेबाज कामगिरी; कॉपर चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करत १९ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / चिखली: पिंपरी-चिंचवड शहरात डी.पी. मधील कॉपरच्या तारा व केबल चोरी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ ने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १९ लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचा संशयित कॉपरचा मुद्देमाल, चारचाकी, आयसर गाडी व चोरीचे साहित्य हस्तगत करत पोलिसांनी एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले व त्यांचे पथक गस्त घालत असताना, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम लोणकर व पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना कॉपर चोरीबाबत गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने ६ संशयितांना वाहनांसह ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी १) जयराम विक्रम साळंके (वय २९ वर्षे, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी; मूळ रा. धाराशिव) , २) सूरज जालिंदर फड (वय २१ वर्षे, रा. जाधववाडी, चिखली; मूळ रा. बीड) , ३) सचिन जालिंदर फड (वय २६ वर्षे, रा. संभाजीनगर, मोशी; मूळ रा. बीड) , ४) मोहम्मद रियाज मोहम्मद बशीर सलमानी (रा. चिखली; मूळ रा. उत्तर प्रदेश) , ५) मनोज संतोषी चौधरी (रा. कुदळवाडी, चिखली; मूळ रा. उत्तर प्रदेश) , ६) अनुकुमार रामकृपाल गौतम (रा. चिखली; मूळ रा. उत्तर प्रदेश) , आरोपींकडून १८,७४,००० रुपये किमतीचे कॉपर, एक चारचाकी गाडी आणि आयसर वाहन जप्त करण्यात आले. तपासात आरोपींनी तळेगाव एमआयडीसी आणि चिखली भागातील विविध ठिकाणांवरून डी.पी. मधील कॉपरच्या तारा व केबल चोरी केल्याची कबुली दिली. यावरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील ६ गुन्हे आणि चिखली पोलीस ठाण्यातील २ गुन्हे उघडकीस आले.

तसेच, देहूरोड पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा (गु.र.नं. ३०२/२०२६) समांतर तपास करताना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने घटनास्थळावरील CCTV फुटेजच्या आधारे आरोपी अजय प्रल्हाद गायकवाड (वय ५० वर्षे, रा. माधवनगर, चिखली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १,१०,५०० रुपये किमतीची केबल वायर, २ ग्राइंडर मशीन, २ रेग्युलेटर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे: गु.र.नं. २२३/२०२६, २६४/२०२६, २५९/२०२६, १८६/२०२६ (BNS कलम ३०३(२)) आणि गु.र.नं. २९/२०२६, ८१/२०२६ (भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६). चिखली पोलीस ठाणे: गु.र.नं. ५३१/२०२६ (BNS कलम ३०५) आणि ५२६/२०२६ (BNS कलम ३०३(२)). देहूरोड पोलीस ठाणे: गु.र.नं. ३०२/२०२६ (BNS कलम ३०३(२)).

 

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सपोफौ लोणकर, वायभसे, अंमलदार मोरे, महाडीक, सोडगीर, असवले, सोनटक्के, बोराटे, मेरगळ, वेताळ, खेडकर, सुखदाने, मुंडे, खराडे, माटे, नागरे, सोनवणे, बाळसराफ तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे सपोफौ माळी, ननावरे आणि कारके यांच्या पथकाने केली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!