news
‘सरकारी नोकरीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, भामट्यावर गुन्हा दाखल!‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!‘नागरिकांना त्रास न होता पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने कचऱ्याची विल्हेवाट लावणार’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!‘कृषी पर्यटनातून साधणार ग्रामीण विकास अन् महिला सक्षमीकरण’; पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांचे प्रतिपादन!‘महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमा डागाळणारे अश्लील प्रकार खपवून घेणार नाही’; पुणे प्रशासनाच्या कारवाईनंतर टीना शर्मा घेवारे आक्रमक!
Home अमरावती ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’; अंबाजोगाईतील राज्य कार्यकारिणी बैठकीत ‘देवळाचा धर्म व धर्माची मस्जिद’ पुस्तकावर चर्चा!

‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’; अंबाजोगाईतील राज्य कार्यकारिणी बैठकीत ‘देवळाचा धर्म व धर्माची मस्जिद’ पुस्तकावर चर्चा!

अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी पुस्तक ठरणार प्रभावी; अंनिस पदाधिकाऱ्यांकडून रजियाताई सुलताना यांच्या लेखनाचे कौतुक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘देवळाचा धर्म व धर्माची मस्जिद’चा विवेकवादी विचार राज्य कार्यकारिणीपर्यंत; अंबाजोगाईत ‘अंनिस’च्या राज्य पदाधिकाऱ्यांना पुस्तक भेट!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन , दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अंबाजोगाई (बीड) : अमरावती येथील ज्येष्ठ लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या रजियाताई सुलताना लिखित ‘देवळाचा धर्म व धर्माची मस्जिद’ हे नूतन प्रकाशित पुस्तक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना भेट देण्यात आले. अंबाजोगाई (जि. बीड) येथील मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात आयोजित ‘अंनिस’च्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीदरम्यान हा उपक्रम पार पडला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दर चार महिन्यांनी राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित केली जाते. १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या या बैठकीत राज्यातील विविध शाखांच्या कार्याचा आढावा, संघटनात्मक बळकटीकरण आणि आगामी उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली.

रजियाताई सुलताना यांच्या ‘देवळाचा धर्म व धर्माची मस्जिद’ या पुस्तकातून धर्म, समाज आणि विवेकवादी विचारांच्या अनुषंगाने परखड व प्रबोधनात्मक मांडणी करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, हे पुस्तक त्यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोन महान सुधारकांना समर्पित केले आहे. समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड आणि धार्मिक अंधतेविरोधात चिकित्सक बुद्धी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हे लेखन अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

अमरावतीचे अंनिस जिल्हाकार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर आणि जिल्हा प्रधानसचिव विजय डवरे यांच्या हस्ते ‘अंनिस’च्या प्रमुख राज्य पदाधिकाऱ्यांना हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. यामध्ये माधव बावगे (राज्याध्यक्ष, महा. अंनिस) , संजय बनसोडे (राज्य कार्याध्यक्ष) , विनायक सावळे (राज्य प्रधानसचिव) , टी. आर. गोराने, रुकसाना मुल्ला, आरती नाईक (राज्य पदाधिकारी) , अशोक निकम (राज्य कार्यवाह) , प्राचार्य, मानवलोक समाजकार्य महाविद्यालय, अंबाजोगाई

 

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पुस्तकाच्या माध्यमातून विवेकवादी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश समाजात अधिक व्यापकपणे पोहोचवला जाईल. ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया!’ या विचाराने प्रेरित होऊन वाचन, लेखन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात चिकित्सक विचार रुजविण्याची चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!