news
‘सरकारी नोकरीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, भामट्यावर गुन्हा दाखल!‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!‘नागरिकांना त्रास न होता पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने कचऱ्याची विल्हेवाट लावणार’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!‘कृषी पर्यटनातून साधणार ग्रामीण विकास अन् महिला सक्षमीकरण’; पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांचे प्रतिपादन!‘महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमा डागाळणारे अश्लील प्रकार खपवून घेणार नाही’; पुणे प्रशासनाच्या कारवाईनंतर टीना शर्मा घेवारे आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘श्री संत सेना महाराजांच्या विचारांचा जागर’; पिंपरी-चिंचवडमध्ये ६५६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल!

‘श्री संत सेना महाराजांच्या विचारांचा जागर’; पिंपरी-चिंचवडमध्ये ६५६ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल!

अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; भाविक अन् समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये श्री संत सेना महाराज यांची ६५६ वी पुण्यतिथी उत्साहात साजरी; विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / वाकड: महाराष्ट्र नाभिक महामंडळ (वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, डांगे चौक, थेरगाव, भोसरी व पिंपरी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत सेना महाराज यांची ६५६ वी पुण्यतिथी शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यास अध्यात्मिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यामध्ये गुरुवर्य माऊली महाराज वाळुंजकर, आमदार अश्विनी जगताप, नरेंद्र पेंडसे (कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), गणेश वाळुंजकर (कार्याध्यक्ष), सागर आढाव (शहराध्यक्ष), अनिता वाळुंजकर (भाजपा मंडळ अध्यक्ष), वैशाली खाडे (सरचिटणीस), सचिन सूर्यवंशी, विकास डोलस, राजेश पाथरकर, रामदास सूर्यवंशी (प्रदेशाध्यक्ष), काका शेळके (प्रमुख, अनुलोम संस्था), यशवंत आपुणे (जिल्हा सरचिटणीस), संतोष शिंदे, महादेव माने, महादेव वाळुंजकर, माजी नगरसेवक अश्विनी वाबले, कविता भोगाले यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात बालकीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वरी राऊत आणि कबीर महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाली. कीर्तनातून श्री संत सेना महाराज यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा जागर करण्यात आला.
याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यास रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच महिलांसाठी वैष्णवी राऊत यांच्या सहकार्याने रंगतदार ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस हेमंत श्रीखंडे, उपाध्यक्ष रवी फुलपगारे, सचिव अमोल कस्तुरे, मयूर पवार, गणेश राऊत, नागेश कोकाटे, किशोर पवार, तुषार क्षीरसागर, संदीप पंडित, संदीप दळवी, गणेश गायकवाड, मयूर आढाव, मारुती काटके, संदीप महाले, चेतन महाले, जितेंद्र चिते, राम जाधव, जितेंद्र जाधव, शहाजी सूर्यवंशी, नाना सुरवसे आणि आतिश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!