news
‘सरकारी नोकरीच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका’; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, भामट्यावर गुन्हा दाखल!‘साक्षीदारांची सुरक्षा धोक्यात; धमकावणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा’; किशोर आवारे खटल्यातील प्रत्यक्षदर्शींची ठाम मागणी!‘नागरिकांना त्रास न होता पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाने कचऱ्याची विल्हेवाट लावणार’; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन!‘कृषी पर्यटनातून साधणार ग्रामीण विकास अन् महिला सक्षमीकरण’; पर्यटन उपसंचालक विजय जाधव यांचे प्रतिपादन!‘महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रतिमा डागाळणारे अश्लील प्रकार खपवून घेणार नाही’; पुणे प्रशासनाच्या कारवाईनंतर टीना शर्मा घेवारे आक्रमक!
Home पिंपरी चिंचवड ‘लहान वयातील पर्यावरणपूरक सवयी समाजाला दिशा देतील’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांचे प्रतिपादन!

‘लहान वयातील पर्यावरणपूरक सवयी समाजाला दिशा देतील’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांचे प्रतिपादन!

थर्माकोल ऐवजी नैसर्गिक सजावटीवर भर देण्याचे आवाहन; थेरगावच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयात कार्यशाळा संपन्न | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्तुत्य उपक्रम; यशवंतराव चव्हाण विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हातून साकारला पर्यावरणपूरक बाप्पा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १३ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी / थेरगाव; पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासोबतच यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ आणि ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानांतर्गत ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक २३ मधील यशवंतराव चव्हाण विद्यालय, थेरगाव येथे विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने शाडू माती व नैसर्गिक साहित्याचा वापर करून स्वतःच्या हाताने सुरेख गणेशमूर्ती साकारत हरित गणेशोत्सवाचा अनोखा संदेश दिला.
हा उपक्रम महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि आरोग्य विभागाचे उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी केवळ शाडू मातीच्या मूर्तीच तयार केल्या नाहीत, तर उत्सवादरम्यान पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून सजावट करण्याचा संकल्प केला. थर्माकोल आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कागद, कापड, बांबू, वनस्पतींची पाने आणि नैसर्गिक फुलांचा वापर करून आरास प्रोत्साहन देण्यात आले.

“गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि उत्साहाचा सण आहे. हा उत्सव साजरा करताना निसर्गाचे रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, नैसर्गिक सजावट आणि प्लास्टिकमुक्त उत्सवाचा संदेश घराघरांत पोहोचण्यास मदत होईल. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये या सवयी रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर दिसून येईल.”
डॉ. प्रदीप ठेंगल, उपआयुक्त (आरोग्य), पिंपरी-चिंचवड महापालिका.

या कार्यशाळेस सहाय्यक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक गोपाल धस, आरोग्य सहाय्यक सचिन उघडे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर यांच्यासह शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची नवी चेतना निर्माण झाली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!