news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home पिंपरी चिंचवड ‘चिंटू अन् ग्रीझी अस्वलाच्या जुगलबंदीने फुलवले हास्य’; चिखली टाऊन हॉलमध्ये बालनाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद!

‘चिंटू अन् ग्रीझी अस्वलाच्या जुगलबंदीने फुलवले हास्य’; चिखली टाऊन हॉलमध्ये बालनाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद!

रंगीत नेपथ्य अन् सुरेल गाण्यांनी जिंकली चिमुकल्यांची मने; मराठी रंगभूमी आणि भक्तिसंगीताचा झाला सुरेख परिचय | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ने रंगविले महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे बालमन; ‘अभंगवारी’ने जागविला भक्तिभाव!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ या उपक्रमांतर्गत चिखली टाऊन हॉल येथे सोमवारी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. लहान मुलांसाठी विशेष मनोरंजनात्मक स्वरूपाच्या या बालनाट्याला विद्यार्थ्यांनी तुफान प्रतिसाद दिला.
नाटकातील विनोदी प्रसंग, ग्रीझी अस्वल आणि चिंटू यांच्यातील धमाल जुगलबंदी, मजेदार गाणी आणि नृत्यामुळे संपूर्ण वातावरणात हास्य आणि उत्साहाचे रंग भरले.

या बालनाट्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्यासाठी उभारण्यात आलेले भव्य आणि रंगीत नेपथ्य ठरले. बालमनाला आकर्षित करणाऱ्या रंगसंगती आणि दृश्यरचनेमुळे नाटकातील कल्पनाविश्व अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले.
हास्य, गाणी, उत्कृष्ट प्रकाशयोजना आणि ग्रीझी-चिंटूच्या धमाल प्रसंगांनी रंगलेल्या या बालनाट्याचा महापालिका शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अभिजात मराठी भाषा सप्ताहातील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि मराठी रंगभूमीशी त्यांचा अत्यंत मनोरंजक पद्धतीने परिचय झाला.

बालनाट्यानंतर चिखली टाऊन हॉल येथे ‘सा रे ग म प’ फेम गायक ज्ञानेश्वर मेश्राम, गायिका कल्याणी देशपांडे आणि सहकाऱ्यांचा अभंग व भक्तीगीतांचा ‘अभंगवारी’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
संतपरंपरेतील अभंग, भावपूर्ण भक्तीगीते आणि त्यातून व्यक्त होणारी अध्यात्मिक भावना यांमुळे चिखली टाऊन हॉल भक्तिरसात न्हाऊन निघाला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे मराठी भाषेच्या सांस्कृतिक आणि भक्तिसंगीताच्या समृद्ध परंपरेचा अनुभव उपस्थितांनी घेतला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!