news
‘पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा प्रयत्न’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन!‘तेजश्री अडिगे दिग्दर्शित ‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेचे बाली येथे यशस्वी सादरीकरण’; २० कलाकारांच्या सन्मानाने कला क्षेत्रात उत्साह!‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित व प्रभावी करा’; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश!‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘नाश्ता, जेवण अन् मनोरंजनाची धमाल’; ज्येष्ठ नागरिकांनी ‘निसर्ग छाया’मध्ये लुटला सहलीचा आनंद!

‘नाश्ता, जेवण अन् मनोरंजनाची धमाल’; ज्येष्ठ नागरिकांनी ‘निसर्ग छाया’मध्ये लुटला सहलीचा आनंद!

'निसर्ग छाया फाउंडेशन'मध्ये ४४ ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग; संगीत खुर्ची, डान्स अन् खेळांची लुटली मेजवानी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘आनंद ज्येष्ठ नागरिक संघा’ची भूगाव येथे एक दिवसीय सहल उत्साहात संपन्न!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

वाकड: आनंद ज्येष्ठ नागरिक संघ (पोस्टल कॉलनी, वाकड) यांच्या वतीने भूगाव (पौड रोड) येथील प्रसिद्ध ‘निसर्ग छाया फाउंडेशन’ येथे एक दिवसीय सहलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या सहलीत ज्येष्ठ नागरिकांनी दिवसभर मौज, मजा आणि मस्ती करत बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून भूगाव येथे ‘निसर्ग छाया फाउंडेशन’ची भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. निसर्गाच्या कोंदणात वसलेल्या या वास्तुचे व्यवस्थापक म्हणून श्री. मंदार देगावकर व सौ. अमृता देगावकर हे उत्तम कामकाज पाहत आहेत.

या सहलीमध्ये १९ पुरुष आणि २५ महिला मिळून एकूण ४४ ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. परिसरात प्रवेश करताच तेथील नयनरम्य वातावरणामुळे सर्व सदस्यांच्या प्रवासाचा थकवा क्षणात निघून गेला. आयोजकांकडून चहा, नाश्ता आणि जेवणाची अत्यंत उत्तम व चविष्ट सोय करण्यात आली होती.
दिवसभरात सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, डान्स, गाणी, रिंग फेक, फुगे आणि डंबेल यांसारख्या खेळांचा समावेश होता. सर्व सदस्यांनी या खेळांमध्ये बालसुलभ उत्साहाने सहभाग घेतला. “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” या उक्तीचा प्रत्यय देत सर्वांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.

दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद, धमाल आणि खेळ खेळल्यानंतर संध्याकाळी सर्व ज्येष्ठ नागरिक अत्यंत समाधानी आणि आनंदी वातावरणात परतीच्या प्रवासाला निघाले. या सहलीमुळे सर्व सदस्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!