news
‘पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा प्रयत्न’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन!‘तेजश्री अडिगे दिग्दर्शित ‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेचे बाली येथे यशस्वी सादरीकरण’; २० कलाकारांच्या सन्मानाने कला क्षेत्रात उत्साह!‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित व प्रभावी करा’; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश!‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘मतदार याद्यांतील घोळ अन् नागरिकांमधील संभ्रम’; लोकशाही रक्षणासाठी सामाजिक संघटना अन् पुरोगामी पक्षांचे आंदोलन!

‘मतदार याद्यांतील घोळ अन् नागरिकांमधील संभ्रम’; लोकशाही रक्षणासाठी सामाजिक संघटना अन् पुरोगामी पक्षांचे आंदोलन!

पंतप्रधान, गृहमंत्री अन् मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; ८ ऑक्टोबरला नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

लोकशाहीच्या रक्षणासाठी ८ ऑक्टोबरला पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लोकशाही बचाव मार्च’!

पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: लोकशाही आणि संविधानाच्या सुरक्षेसह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुरुवारी, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘लोकशाही बचाव मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे.
हा मार्च गुरुवारी सकाळी ११ वाजता आकुर्डी गावातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर येथून निघणार असून निगडी येथील तहसीलदार कार्यालयावर धडकणार आहे.

मतदार याद्यांमधील अचानक होणारे बदल, पात्र मतदारांच्या नावांबाबत निर्माण होणारे प्रश्न तसेच ‘विशेष पुनर्परीक्षण अभियान’ (SIR) यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम व चिंता निर्माण झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक असावी, यासाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे.
आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या मार्चद्वारे प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाचे कामकाज पारदर्शक, निष्पक्ष व स्वतंत्र पद्धतीने पूर्ववत करावे. वादग्रस्त ठरणारे ‘विशेष पुनर्परीक्षण अभियान’ (SIR) तात्काळ रद्द करावे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या निर्णयांचे स्वतंत्र पुनर्परीक्षण करण्यात यावे. निवडणूक प्रक्रियेतील अनियमततेची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा.

 

दिनांक गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६, वेळ सकाळी ११:०० वाजता, मार्ग विठ्ठल मंदिर (आकुर्डी गाव) ते तहसीलदार कार्यालय (निगडी), आयोजक पिंपरी-चिंचवड इंडिया आघाडी, सिव्हिल सोसायटी, पुरोगामी व सामाजिक संघटना

 

या मार्चमध्ये इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!