news
‘पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा प्रयत्न’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन!‘तेजश्री अडिगे दिग्दर्शित ‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेचे बाली येथे यशस्वी सादरीकरण’; २० कलाकारांच्या सन्मानाने कला क्षेत्रात उत्साह!‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित व प्रभावी करा’; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश!‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!
Home अमरावती ‘आइन्स्टाईनपासून ख्रिस्त-बुद्धांच्या परंपरेशी जोडलेले विचार’; अमरावतीत गांधी विचारांवर प्रबोधनाचा सुरेल जागर!

‘आइन्स्टाईनपासून ख्रिस्त-बुद्धांच्या परंपरेशी जोडलेले विचार’; अमरावतीत गांधी विचारांवर प्रबोधनाचा सुरेल जागर!

भजनांतून बापूजींना अभिवादन; डॉ. राणी नागापुरे यांचा विशेष सत्कार व विविध सामाजिक संस्थांचा सहभाग | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

गांधीवाद हा धार्मिक अन् आध्यात्मिक मानवतावाद : डॉ. सतीश तराळ

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: महात्मा गांधी हे विश्वातील थोर व्यक्तिमत्त्व असून, गांधीवाद ही जगातील अभूतपूर्व व वैशिष्ट्यपूर्ण विचारसरणी आहे. शस्त्राशिवाय केवळ अहिंसेच्या मार्गाने महासत्तेविरुद्ध स्वातंत्र्यलढा उभा करणारे गांधीजी हे जागतिक इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा आचार हाच खरा गांधीवाद असून, गांधीवाद हा मूलतः धार्मिक व आध्यात्मिक मानवतावाद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांनी केले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट (राधानगर, अमरावती) यांच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित गांधी जयंती उत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या जीवनमूल्यांवर विविध मान्यवरांनी मते मांडली.

डॉ. तराळ पुढे म्हणाले की, गांधीवादाचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगावर पडला आहे. जगातील अनेक मोठे नेते, विचारवंत, शास्त्रज्ञ आणि कलावंत त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले. विश्वविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनीही गांधीजींच्या अहिंसा आणि नैतिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले होते. ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या मानवतावादी परंपरेशी जोडलेले गांधीजींचे विचार कालातीत आहेत. एकादशव्रत, असहकार, सर्वोदय आणि सत्याग्रह ही गांधीजींनी जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी आहे.

कार्यक्रमादरम्यान महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, सर्वधर्मसमभाव आणि स्वावलंबनाच्या विचारांसोबतच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक समता व शिक्षणाच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांचे स्मरण करण्यात आले. समाजात वाढती व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धा या प्रश्नांवर मात करण्यासाठी विवेकवादी व मानवतावादी समाज निर्मितीचे आवाहन करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. दिलीप काळे, श्री पुरुषोत्तमराव गावंडे, प्राचार्य दिलीपसिंह खांबारे, डॉ. भोजराज चौधरी, डॉ. शोभा गायकवाड, डॉ. मंदा नांदुरकर, ॲड. नीता कचवे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, प्रा. नेहा भटकर, प्राचार्य दादाराव दाभाडे, अनिल पांचाळे, प्रा. नरेंद्र राऊत व डॉ. श्रीधरराव जावरकर यांनी विचार मांडले. तसेच श्री बाळासाहेब महल्ले, प्राचार्य रामकृष्ण धारपवार, गजेंद्र पाथरे, नीलिमा भोजने व छाया पाथरे यांनी गांधीविचारांवर आधारित भजने सादर केली.
कार्यक्रमात डॉ. राणी नागापुरे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक डॉ. मंदा नांदुरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महात्मा फुले शताब्दी जन्मोत्सव समिती, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सर्वोदय मंडळ अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन यांसह अनेक सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम प्रसंगी अनंत हागोने, शंकरराव वसू, संतोष देशमुख, नरेंद्र तायवाडे, नीलिमा भोजने, बबिता वानखडे, प्रतिभा खापरे, संजय खापरे, सचिन वासनिक, साहेबराव खंडारे, बाबुरावजी कोंडे, जयंतराव पिहुलकर, उल्हे काका यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले, तर आभार प्रतिभा खापरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मानद संस्थापक व सचिव वसंतराव वंडलकर, कार्याध्यक्ष श्रीधरराव डहाके, कोषाध्यक्ष रामदासजी सदार, अनंतराव हागोने आणि श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!