news
‘पिंपळे सौदागरच्या विकासात आधुनिकता आणि सौंदर्य यांचा संगम साधण्याचा प्रयत्न’; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे प्रतिपादन!‘तेजश्री अडिगे दिग्दर्शित ‘श्री रामराज्य’ नृत्यनाटिकेचे बाली येथे यशस्वी सादरीकरण’; २० कलाकारांच्या सन्मानाने कला क्षेत्रात उत्साह!‘मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कचरा व्यवस्थापन अधिक सुरक्षित व प्रभावी करा’; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश!‘गुरुवारी दिवसभर पाणीकपात, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे’; महापालिका पाणीपुरवठा विभागाचे आवाहन!‘शहराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे जीवनमान आणि भविष्यातील आव्हानांवर लक्ष केंद्रित करणारा हवा’; महापौर रवि लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘भूमाफियांना अभय अन् सर्वसामान्यांवर कारवाई?’; पीएमआरडीए कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू!

‘भूमाफियांना अभय अन् सर्वसामान्यांवर कारवाई?’; पीएमआरडीए कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू!

युवा जन सजग नागरिक मंच प्रशासनाविरोधात आक्रमक; अमोल परदेशी यांचा निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा |© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पीएमआरडीएच्या मनमानी कारभाराविरोधात युवा जन सजग नागरिक मंच आक्रमक; ५ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिया आंदोलन!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या आणि भूमाफियांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाविरोधात ‘युवा जन सजग नागरिक मंच’च्या वतीने ५ ऑक्टोबर २०२६ पासून पीएमआरडीए कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अमोल शिरीष परदेशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, प्रशासनाच्या पक्षपाती भूमिकेविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पीएमआरडीएच्या अंतर्गत येणाऱ्या विविध तालुक्यांमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

 ‘महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामातील दप्तरदिरंगाईस प्रतिबंध अधिनियम, २००५’ नुसार खेड, मुळशी, मावळ, हवेली, शिरूर, दौंड आणि पुरंदर या भागांतील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींवर कारवाई न करणाऱ्या आणि राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. भारतीय संविधान, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) आणि पीएमआरडीएच्या विकास नियमावलीनुसार (DCPR) परिसरातील सर्व बेकायदेशीर प्लॉटिंग व अनधिकृत बांधकामांवर तातडीने निष्कासनाची (Demolition) कारवाई करण्यात यावी. स्थानिक राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी व आयुक्त कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहेत. प्रशासनाने या प्रभावातून बाहेर पडून तात्काळ कायदेशीर अंमलबजावणी करावी.  ‘इमारत बांधकाम व बांधकाम नियंत्रण विभागा’ने वेळेचे कारण सांगून टाळाटाळ करू नये. अनधिकृत बांधकामे करणाऱ्या भूमाफियांवर आणि विकासकांवर तात्काळ फौजदारी खटले (Criminal Cases) दाखल करून बांधकामे पाडण्यात यावीत.

 

“नियम सर्वांसाठी समान आहेत, मग पीएमआरडीए प्रशासन विशिष्ट भागांतील विशिष्ट इमारतींवरच कारवाई करून भूमाफियांना अभय का देत आहे?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या दुतोंडी व पक्षपाती भूमिकेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला असून, सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम पवित्रा अमोल परदेशी व आंदोलकांनी घेतला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!