news
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नाटकांची रेलचेल; ‘वरवरचे वधू-वर’ने मांडले आजच्या पिढीतील नात्यांचे वास्तवRTI मध्ये माहिती लपवल्याचा आरोप; ‘युवा जन सजग नागरिक मंच’चा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशाराआनंद ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व स्नेहमेळावा उत्साहात; भावगीते, भजने अन् नृत्याने वातावरणात भरला उत्साहमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली; १३ कोटींहून अधिक मतदारांच्या नावांवरून निर्माण झाले गंभीर प्रश्नचिन्हमहाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक फाउंडेशनकडून उमेदवारी जाहीर; जुनी पेन्शन, प्रलंबित अनुदानासह शिक्षकांच्या प्रश्नांवर लढ्याचा निर्धार
Home अमरावती ‘शिक्षकांच्या निवडणुकीत डिजिटल प्रचारावर ‘एमसीएमसी’चा वॉच’; जाहिरातींसाठी ३ दिवस आधी अर्जाचे आवाहन!

‘शिक्षकांच्या निवडणुकीत डिजिटल प्रचारावर ‘एमसीएमसी’चा वॉच’; जाहिरातींसाठी ३ दिवस आधी अर्जाचे आवाहन!

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिममध्ये MCMC समित्या सक्रिय; 'पेड न्यूज'वर राहणार करडी नजर | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय ‘एमसीएमसी’ समिती कार्यान्वित!

अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. ०६ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

अमरावती: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (MCMC) कार्यान्वित करण्यात आली आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे. निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांतील प्रचार साहित्य, बल्क एसएमएस आणि व्हॉईस मेसेजेस यांचे ‘एमसीएमसी’ समितीकडून पूर्व प्रमाणीकरण (Pre-certification) करून घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी दिली.
निवडणूक काळात राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून प्रचारासाठी विविध इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या काळात वृत्तपत्रे व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील ‘पेड न्यूज’वर (Paid News) बारीक लक्ष ठेवण्यासोबतच सर्व प्रकारच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याची महत्त्वाची जबाबदारी या समितीकडे सोपवण्यात आली आहे.

दूरचित्रवाणी (TV) वाहिन्या, केबल नेटवर्क, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक व खासगी एफएम (FM) चॅनेल्स आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केल्या जाणाऱ्या ऑडिओ-व्हिज्युअल जाहिराती.  व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), युट्यूब यांसारखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि इंटरनेट संकेतस्थळांवर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिराती. बल्क एसएमएस (Bulk SMS) आणि पूर्व-मुद्रित व्हॉईस मेसेजेस (Recorded Voice Messages) या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक.

 

प्रसारित करावयाच्या जाहिरातीचा मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आणि दोन प्रतिंमधील संहितेसह (Code/Script) प्रसारणाच्या किमान ३ दिवस अगोदर समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवार आणि राजकीय पक्षांनी जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयात (DIO) स्थापन करण्यात आलेल्या ‘एमसीएमसी’ कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!