news
Home पिंपरी चिंचवड ‘विज्ञानापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत अभूतपूर्व योगदान’; पिंपरी पालिकेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती साजरी!

‘विज्ञानापासून राष्ट्रनिर्मितीपर्यंत अभूतपूर्व योगदान’; पिंपरी पालिकेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती साजरी!

'जनतेचे राष्ट्रपती' आणि महान वैज्ञानिकाच्या स्मृतीस नमन; मनपाच्या मुख्य इमारतीत अभिवादन सोहळा पार | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड मनपा मुख्य इमारतीत अभिवादन; ‘मिसाईल मॅन’च्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान , दि. १५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: भारताचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाणारे भारतरत्न दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या अभिवादन सोहळ्यास महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मीला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपायुक्त आण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम (तमिळनाडू) येथे जन्मलेल्या डाॅ. कलाम यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी बालपणी वृत्तपत्रे विकण्याचे कामही केले, परंतु शिक्षणावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताच्या पहिल्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहनाला (SLV-III) अवकाशात यशस्वीपणे पाठवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. ‘ देशाच्या संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता आणण्यासाठी त्यांनी ‘अग्नि’ आणि ‘पृथ्वी’ यांसारख्या क्षेपणाstraंच्या विकासात आणि पोखरण अणू चाचण्यांमध्ये (१९९८) वैज्ञानिक सल्लागार म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळली. यामुळेच त्यांना भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते. २००२ ते २००७ या काळात त्यांनी भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून भूषविले. राष्ट्रपती भवनाची दारे सर्वसामान्यांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खुली करून त्यांनी ‘पीपल्स प्रेसिडेंट’ (जनतेचे राष्ट्रपती) हा किताब सार्थ ठरवला. देशातील तरुणाईवर आणि विद्यार्थ्यांवर त्यांचे अगाध प्रेम होते. “मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा,” हा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. ‘विंग्स ऑफ फायर’ (अग्निपंख), ‘इग्नायटेड माईंड्स‘ यांसारख्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना नेहमीच विचार करण्याची नवी दिशा दिली. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!