39

४ वर्षांपासून चकवा देणाऱ्या फरार आरोपीसह तिघे जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट-३ ची धडक कारवाई, विद्युत डीपी चोरीचे ६ गुन्हे उघड!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. १५ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ग्रामीण भागात विद्युत डीपी (ट्रान्सफॉर्मर) मधील तांब्याच्या तारांची चोरी करून शेतकरी व महावितरणचे मोठे नुकसान करणाऱ्या अट्टल टोळीचा गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गेल्या चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीसह त्याच्या दोन साथीदारांना हत्यारांसह अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ गुन्हे उघडकीस आणून ५ लाख ९१ हजार रुपये किंमतीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिघी, आळंदी आणि चाकण परिसरातील शेती व औद्योगिक भागातील विद्युत डीपी चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.
गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांचे पथक समांतर तपास करत असताना, पोलीस अंमलदार दिलीप राठोड व बाळासाहेब खेडकर यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी करणारे इसम मरकळ व पिंपळगाव परिसरात आले आहेत. माहिती मिळताच पथकाने तातडीने धाव घेऊन संशयितरीत्या दुचाकीवरून डीपी चोरीच्या हत्यारांसह फिरणाऱ्या तीन इसमांना ताब्यात घेतले.
सभाजित मुरलीधर गौतम जैस्वार (वय ४५ वर्षे, रा. भदखीन, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), विनोद हरीराम जैस्वार (वय ४० वर्षे, रा. जेगापूर, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), मनिष महेंद्र प्रसाद (वय ३८ वर्षे, रा. भदखीन, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश), जुलफकार खान (रा. मंतरवाडी, उंड्री – फरार / पाहिजे असलेला आरोपी) अधिक चौकशी केली असता, त्यांनी फरार साथीदार जुलफकार खान याच्या मदतीने मरकळ, पिंपळगाव आणि सोळू परिसरात डीपी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी पंचांसमक्ष आरोपींकडून चोरी गेलेल्या तांब्याच्या तारांचे गट्टू, चोरीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि एक दुचाकी असा एकूण ५,९१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उघडकीस आलेले आळंदी पोलीस ठाण्यातील गुन्हे -आळंदी पो.स्टे. गु.र.नं. ३७०/२०२६ (भा.न्या.स. ३०३(२), भारतीय विद्युत कायदा १३६), आळंदी पो.स्टे. गु.र.नं. ४६३/२०२६ (भारतीय विद्युत कायदा १३६), आळंदी पो.स्टे. गु.र.नं. ३८८/२०२६ (भारतीय विद्युत कायदा १३६), आळंदी पो.स्टे. गु.र.नं. ३२१/२०२५ (भा.न्या.स. ३०३(२), भारतीय विद्युत कायदा १३६), आळंदी पो.स्टे. गु.र.नं. ५३१/२०२५ (भा.न्या.स. ३०३(२), भारतीय विद्युत कायदा १३६), आळंदी पो.स्टे. गु.र.नं. १५७/२०२५ (भा.न्या.स. ३२४(४), ३०३(२)),
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, भरत गोसावी, पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, सोमनाथ बोऱ्हाडे, बाळासाहेब खेडकर, दिलीप राठोड, स्वप्निल महाले आणि अजित रूपनवर यांच्या पथकाने केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

