news
Home पुणे ‘पुण्यात सई मांजरेकरचा ग्लॅमरस अंदाज’; शॉपर्स स्टॉपच्या दिवाळी फेस्टिव्ह कलेक्शनचे शानदार अनावरण!

‘पुण्यात सई मांजरेकरचा ग्लॅमरस अंदाज’; शॉपर्स स्टॉपच्या दिवाळी फेस्टिव्ह कलेक्शनचे शानदार अनावरण!

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमध्ये फॅशन शो; चार वेगवेगळ्या थीम्ससह पारंपरिक व वेस्टर्न वेअरचे सादरीकरण | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शॉपर्स स्टॉपकडून पुण्यात विशेष दिवाळी फॅशन शोकेसचे आयोजन; अभिनेत्री सई मांजरेकर ठरल्या शोस्टॉपर!

पुणे/पिंपरी प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुणे: भारतातील फॅशन, ब्युटी आणि गिफ्टिंग क्षेत्रातील आघाडीच्या प्रीमियम ब्रँड ‘शॉपर्स स्टॉप’ (Shoppers Stop) ने पुण्यातील सेनापती बापट रस्ता येथील पॅव्हेलियन मॉल मध्ये एका विशेष फॅशन शोकेसचे आयोजन करून दिवाळीचा उत्सवी आनंद द्विगुणित केला. या खास फेस्टिव्ह फॅशन कलेक्शनच्या सादरीकरणादरम्यान बॉलीवूड व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई मांजरेकर यांनी शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक करत उपस्थितांची मन जिंकली.
दिवाळीच्या विविध रंगछटांवरून प्रेरित होऊन या शोमध्ये चार वेगवेगळ्या फॅशन थीम्स सादर करण्यात आल्या होत्या.  कॅज्युअल वेस्टर्न वेअरसह घरी परतण्याच्या आनंदाचे प्रतिनिधित्व. पार्टीवेअर आणि आधुनिक वेस्टर्न स्टाईल्ससह उत्सवी संध्याकाळाचे ग्लॅमर.  फ्युजन आणि इंडो-वेस्टर्न पोशाखांचा सुंदर मेळ.  भव्य सणासुदीच्या क्षणांसाठी परिपूर्ण असे पारंपरिक भारतीय एथनिक वेअर.

शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केअर असोसिएट आणि सीएमओ श्री. जितेन महेंद्र म्हणाले, “दिवाळी म्हणजे आनंदोत्सव, आपुलकी आणि नवी सुरुवात. ‘गिफ्ट्स ऑफ लव्ह’च्या माध्यमातून फॅशन, ब्युटी, परफ्युम्स, वॉचेस् आणि लाइफस्टाइल उत्पादने एकाच छताखाली एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्यात सई मांजरेकर यांच्या हस्ते या फेस्टिव्ह कलेक्शनचे अनावरण झाल्याने उत्सवाचा उत्साह अधिक वाढला आहे.”
हे फेस्टिव्ह कलेक्शन सर्व शॉपर्स स्टॉप स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन उपलब्ध असून, ग्राहकांसाठी ५०० हून अधिक प्रीमियम ब्रँड्सचे पर्याय, पर्सनल शॉपर सेवा आणि फर्स्ट सिटीझन क्लबचे विशेषाधिकार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!