news
Home पिंपरी चिंचवड ‘भागवत परिवाराच्या समाजकार्याचा वारसा पुढे नेणारे तरुण नेतृत्व’; ओंकार भागवत यांची चिंचवड युवा अध्यक्षपदी निवड!

‘भागवत परिवाराच्या समाजकार्याचा वारसा पुढे नेणारे तरुण नेतृत्व’; ओंकार भागवत यांची चिंचवड युवा अध्यक्षपदी निवड!

सांगवी विकास मंचतर्फे अभूतपूर्व सत्कार; सामाजिक व राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

चिंचवड विधानसभा युवा अध्यक्षपदी ओंकार भागवत यांची निवड; सांगवीत उत्साहात संपन्न झाला सत्कार सोहळा!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी सुनील पोकरे , दि. २१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

सांगवी/पुणे: सांगवी विकास मंचचे विद्यमान कार्याध्यक्ष तथा समाजकार्याला समर्पित तरुण नेतृत्व श्री. ओंकार महेशशेठ भागवत यांची नुकतीच चिंचवड विधानसभा कार्यक्षेत्राच्या युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीनिमित्त सांगवी येथे त्यांचा भव्य अभिनंदन व सत्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सांगवी विकास मंचचे अध्यक्ष श्री. महेशशेठ भागवत यांच्या प्रदीर्घ व प्रभावी समाजकार्याचा वारसा ओंकार भागवत समर्थपणे पुढे चालवत असून, त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या कार्याचा योग्य गौरव झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सांगवी विकास मंचच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ प्रवचनकार ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज यांनी श्री. ओंकार भागवत यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी बोलताना त्यांनी, श्री. महेशशेठ भागवत आणि सौ. नीलिमाताई भागवत यांच्या समाजकार्याचा वारसा ओंकार अतिशय प्रभावीपणे पुढे नेत असल्याचे सांगून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
‘मॅक्स मंथन न्यूज’चे प्रतिनिधी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील पोकरे यांनी भागवत परिवाराच्या गौरवशाली समाजकार्याचा उल्लेख केला. श्री. ओंकार भागवत यांनी आपल्या नवीन पदाच्या माध्यमातून युवकांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आणि सामाजिक उपक्रमांना अधिक गतिमान करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले. तसेच त्यांना या वाटचालीत सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी सुवर्णकार समाजाचे नेते श्री. दिलीपकुमार फाकटकर आणि श्री. राजेंद्र पवार यांनीही आपल्या मनोगतातून ओंकार भागवत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्याला परिसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक श्री. भरतशेठ कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळकृष्ण गिरगुने, साई चौक ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री. समेळ काका, ज्येष्ठ साहित्यिक श्री. मुरलीधर दळवी, कुंभार समाजाचे नेते श्री. आण्णासाहेब कुंभार, तसेच श्री. महेशशेठ भागवत यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांगवी विकास मंचचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. नारायणराव शंकरराव भागवत यांनी केले, तर त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अल्पोपाहार व चहाचे वाटप करण्यात आले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!