news
Home पिंपरी चिंचवड ‘उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वय अधिक दृढ होणार’; पीसीयूच्या राष्ट्रीय आयईईई परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर मंथन!

‘उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वय अधिक दृढ होणार’; पीसीयूच्या राष्ट्रीय आयईईई परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर मंथन!

कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांचे मार्गदर्शन; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस व एमआयटीसह नामांकित संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पीसीयूची शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय ठेवण्याची बांधिलकी; राष्ट्रीय आयईईई (IEEE) परिसंवादातून एआय उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी चिंचवड विद्यापीठाची (PCU) उच्च शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक प्रगती आणि उद्योग क्षेत्राशी अर्थपूर्ण समन्वय ठेवण्याची भक्कम बांधिलकी असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आयोजित राष्ट्रीय आयईईई (IEEE) परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या परिसंवादात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एमआयटी विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ (कोल्हापूर), सिंहगड इन्स्टिट्यूटसह विविध शैक्षणिक संस्थांतील तब्बल ११० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

परिसंवादादरम्यान ‘एआय चलित अभियांत्रिकी शिक्षण’ या महत्त्वाच्या सत्रात उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उच्च तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास आणि उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी भर देण्यात आला. एआय आधारित तंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग (Practical Applications) आणि तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू कुलपती तथा विश्वस्त हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेन्द्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
तसेच कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी, अधिष्ठाता डॉ. सचिन पवार, संशोधन व विकास संचालक डॉ. भारत काळे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, इनक्युबेशन व नवोपक्रम संचालक डॉ. प्रणव चरखा, आंतरराष्ट्रीय संबंध केंद्र संचालक डॉ. विजय पाटील, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. जयदीप पाटील आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे डॉ. अमित गाडेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांना एकाच मंचावर आणल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी थेट परिचित होण्याची व त्याचे व्यावहारिक आकलन करण्याची मौल्यवान संधी मिळाली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!