22

एनएमएमएस (NMMS) परीक्षेच्या ऑनलाइन अर्जासाठी तिसरी मुदतवाढ; आता २८ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह करता येणार अर्ज!
अमरावती प्रतिनिधी जयकुमार चर्जन, दि. २१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेच्या (NMMS) परीक्षेसाठी ऑनलाइन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याच्या मुदतीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तिसऱ्यांदा वाढ केली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार आता नियमित शुल्कासह २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज भरता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
www.mscepune.in आणि www.mscenmms.in या अधिकृत संकेतस्थळांवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आगामी २० डिसेंबर २०२६ रोजी ही परीक्षा पार पडणार आहे.नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ ऑक्टोबर २०२६, या मुदतीनंतर कोणतीही विलंब किंवा अतिविलंब शुल्काची अट लागू असणार नाही. तसेच २८ ऑक्टोबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
परीक्षा परिषदेने शाळा आणि विद्यार्थ्यांना अंतिम मुदतीची वाट न पाहता आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
