news
Home मुख्यपृष्ठ ‘पारंपरिक वाद्यांचा गजर अन् आपट्याच्या पानांची देवाणघेवाण; पिंपरीत विजयादशमीनिमित्त ऐतिहासिक सीमोल्लंघन रॅली!’

‘पारंपरिक वाद्यांचा गजर अन् आपट्याच्या पानांची देवाणघेवाण; पिंपरीत विजयादशमीनिमित्त ऐतिहासिक सीमोल्लंघन रॅली!’

राष्ट्रीय श्रमिक आघाडी व संत तुकाराम नगर गृह संस्थेचा संयुक्त उपक्रम; शेकडो नागरिकांनी लुटला दसऱ्याचा आनंद | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून प्रथमच सीमोल्लंघन व सोनं लुटण्याच्या पारंपरिक सोहळ्याला सुरुवात; माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते प्रारंभ!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: दसरा आणि विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर संत तुकाराम नगर व वल्लभनगर परिसरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा सीमोल्लंघन, पथसंचलन आणि सोनं लुटण्याचा पारंपरिक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून प्रथमच सुरू करण्यात आलेल्या या अभिनव सांस्कृतिक उपक्रमाचा प्रारंभ माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते (दि. २०) करण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या माध्यमातून दोन्ही परिसरांतील नागरिकांमध्ये परस्परांतील स्नेह, प्रेम आणि एकात्मतेचा सुंदर संदेश देण्यात आला. या सोहळ्यात परिसरातील शेकडो बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विजयादशमीच्या दिवशी दुपारी ३ वाजता राष्ट्रीय श्रमिक आघाडी व संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था मर्यादितच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य रॅलीला सुरुवात झाली.
यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज, भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना व पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गंगानगर ते अक्षय सोसायटी (YCMH) या रस्त्यावरून सीमाउल्लंघन करण्यापूर्वी माजी नगरसेवक बबनराव गाढवे, भाजप नेते किरण सुवर्णा, भाजप मंडलाध्यक्ष मंगेश धाडगे, भाजप नेते नंदू आप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, दिनेश पाटील, शेखर पाटील, संदीप नाईक आदी कार्यकर्त्यांनी माजी खासदार अमर साबळे व यशवंतभाऊ भोसले यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले.
त्यानंतर वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर यांच्या सीमारेषेवरील गणेश मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. दोन्ही परिसरांतील नागरिकांनी श्री गणेश मंदिरात भक्तिभावाने आपट्याची पाने (सोनं) एकमेकांना देत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची ६ वर्षांची नात लिनेशा हिने देखील प्रथमच सोनं लुटण्याच्या या परंपरेत व पथसंचलनात सहभाग घेतला.

यावेळी बोलताना माजी खासदार अमर साबळे म्हणाले, “विजयादशमीच्या निमित्ताने दुःखातून सुखाकडे आणि पराभवातून यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा सीमोल्लंघनाच्या परंपरेतून मिळते. यशवंतभाऊ भोसले यांनी वल्लभनगर आणि संत तुकाराम नगर परिसरात ही परंपरा सुरू करून सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यात या परिसराचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या उपक्रमाची निश्चितच आठवण ठेवली जाईल.”
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी आपल्या मनोगतात सीमोल्लंघनाच्या परंपरेमागील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट करताना सांगितले की, पूर्वी ग्रामीण भागात दोन गावांतील नागरिक सीमारेषेवर एकत्र येऊन गळाभेट घेत, शुभेच्छा देत आणि मंदिरात जाऊन सोनं लुटत असत. याच जुन्या, समृद्ध परंपरेचे पुनरुज्जीवन संत तुकाराम नगरमध्ये करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

या सोहळ्यास चाकण एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, अनिकेत भोसले, दीपक पाटील, दत्ताजी गायकवाड, आदित्य देशपांडे, राहुल शितोळे, अंकुश वाघमारे, अप्पू नायर, ओंकार जोकारे, मानसी देशपांडे, लता पाटील, चंद्रकांत भालेराव, शालन महापुरे, योगेंद्र आरवडे, कैलास गव्हाणे, शिरीष सासवडे, सतीश सासवडे, श्रेयस करे, विनायक निकम, जेवियर अँथोनी, किसन भाग्यवंत, मल्लेष कोरवी, इस्मत सय्यद, दगडू लेंडे, रावसाहेब पाबळे, सुदाम गायकवाड, आप्पासाहेब माने, नंदकिशोर जोशी, महेश भुते, आरती पराळे, उषा टाकळकर, सुधाकर शिंदे, अंकुश गायकवाड, फौजदार गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, राजाराम भोंडवे, संतोषी चौधरी, सना शेख, दत्तात्रय झरकर, अमोल घोरपडे, प्रिया घोरपडे, राजनी मगर आदी प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!