news
‘समान काम समान वेतन अन् ५ लाखांचा आरोग्य विमा’; यशवंतभाऊ भोसलेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका प्रशासन सकारात्मक!‘MPSC च्या ९ वादग्रस्त परीक्षांबाबत माहिती असल्यास पुढे या’; राज्य शासनाच्या चौकशी आयोगाचे नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवाहन!‘दिवाळीच्या साफसफाईतील जुन्या वस्तू फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात जमा करा’; पिंपरी पालिकेचा स्तुत्य उपक्रम!‘पिंपरी-चिंचवडकरांच्या करदात्यांच्या पैशांची लाचखोरी खपवून घेणार नाही’; भाऊसाहेब भोईर प्रशासनावर कडाडले!‘नगरसेवक स्वेच्छा निधीचा अचूक विनियोग, २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता’; पिंपरी पालिकेचे परिपत्रक जारी!
Home पिंपरी चिंचवड ‘पिंपरी महापालिकेत एसीबीचा मोठा मासा जाळ्यात’; मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे यांना महापालिका मुख्यालयातून घेतले ताब्यात!

‘पिंपरी महापालिकेत एसीबीचा मोठा मासा जाळ्यात’; मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे यांना महापालिका मुख्यालयातून घेतले ताब्यात!

काम मिळवून देण्यासाठी १९ हजारांची लाच मागितल्याचा आरोप; आचारसंहितेच्या काळातच लाचखोरी समोर आल्याने पालिका वर्तुळात खळबळ | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीचा महाधडक छापा; मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे १९ हजारांच्या लाचप्रकरणी ताब्यात, संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी अत्यंत धडक कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्यांचा बुरखा फाडला आहे. महापालिकेतील वर्ग-१ पदाचे मुख्य अभियंता (पाणीपुरवठा विभाग) प्रमोद सुधाकर ओंबासे (वय ५७ वर्ष, रा. निगडी प्राधिकरणा) यांना १९ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (पुणे घटक) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार (प्रेस नोट) प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.  ५७ वर्षीय तक्रारदाराने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे देखभाल, दुरुस्ती व नवीन पाईपलाईन टाकण्याचे एकूण ९१ लाख ५७ हजार ६८ रुपये रकमेचे पाच टेंडर घेतलेले होते. या कामांची वर्क ऑर्डर प्राप्त करण्यासाठी महापालिकेशी करारनामा करणे गरजेचे होते. करारनाम्यावर सह्या करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी टेंडर रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५,७८५ रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने नंतर बघू असे म्हटल्यावर त्यांनी पाचपैकी तीन टेंडर फाईलवर सह्या करून मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्याकडे पाठवून दिल्या होत्या. तक्रारदार यांच्या फाईल्स प्रलंबित असल्याने त्यांनी २९ मे २०२६ रोजी मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांची भेट घेतली. त्यावेळी ओंबासे यांनी टेंडर रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५,७८५ रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने ११ जून २०२६ रोजी एसीबीकडे अधिकृत तक्रार नोंदवली.

 

तक्रारदाराच्या तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने ११ जून २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवक प्रमोद ओंबासे यांनी त्यांच्या टेबलवर असलेल्या तीन फाईल (एकूण ३८ लाख रुपये टेंडर रक्कम) ०.५ टक्के प्रमाणे १९ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी यापूर्वी देखील तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याचे मान्य केले होते.
एसीबीने सापळा रचून कारवाई करत आरोपी लोकसेवक प्रमोद सुधाकर ओंबासे (मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग) यांना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १५.०० वाजता (३ वाजता) गुन्ह्याच्या तपासाकामी ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५७९/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ (सापळा अधिकारी) आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके (पर्यवेक्षण अधिकारी) यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात हवालदार चंद्रकांत जाधवर, कैलास महामुलकर आणि चंद्रकांत कदम यांचा समावेश होता.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!