news
‘समान काम समान वेतन अन् ५ लाखांचा आरोग्य विमा’; यशवंतभाऊ भोसलेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका प्रशासन सकारात्मक!‘MPSC च्या ९ वादग्रस्त परीक्षांबाबत माहिती असल्यास पुढे या’; राज्य शासनाच्या चौकशी आयोगाचे नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवाहन!‘दिवाळीच्या साफसफाईतील जुन्या वस्तू फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात जमा करा’; पिंपरी पालिकेचा स्तुत्य उपक्रम!‘पिंपरी-चिंचवडकरांच्या करदात्यांच्या पैशांची लाचखोरी खपवून घेणार नाही’; भाऊसाहेब भोईर प्रशासनावर कडाडले!‘नगरसेवक स्वेच्छा निधीचा अचूक विनियोग, २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता’; पिंपरी पालिकेचे परिपत्रक जारी!
Home पिंपरी चिंचवड ‘टोरंट प्रकल्पाच्या नावाने सह्याद्रीचा बळी देण्याचा डाव’; कर्जत पाहणीनंतर मारुती भापकर यांचा घणाघात!

‘टोरंट प्रकल्पाच्या नावाने सह्याद्रीचा बळी देण्याचा डाव’; कर्जत पाहणीनंतर मारुती भापकर यांचा घणाघात!

राज ठाकरे, जरांगे पाटलांनंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आक्रमक; सौर अन् पवन ऊर्जेचा पर्याय स्वीकारण्याची मागणी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

सह्याद्रीच्या विनाशाविरोधात ‘सह्याद्री बचाव आंदोलन’; ३१ ऑक्टोबरला उजनी पुलावर ऐतिहासिक रस्ता रोकोची मारुती भापकर यांची हाक!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली राज्यकर्ते आणि उद्योगपतींच्या आर्थिक लाभासाठी निसर्गाचा बळी दिला जात असल्याचा गंभीर आरोप पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. भीमाशंकर अभयारण्य आणि पवित्र भीमाशंकर देवस्थानाला लागून असलेल्या कर्जत तालुक्यातील ‘टोरंट जलविद्युत प्रकल्पा’च्या नावाने सुरू असलेली अथांग वृक्षतोड तात्काळ थांबवावी आणि राज्यभरातील विनाशकारी प्रकल्प रद्द व्हावेत, या मागणीसाठी शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता उजनी पुलावर ऐतिहासिक रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
मारुती भापकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, बुधवार दि. २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी कर्जत येथील टोरंट हायड्रो प्रकल्पाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पासाठी वनविभागाने तब्बल ३२ हजारांहून अधिक जुनी झाडे तोडण्यास मंजुरी दिली असून प्रत्यक्षात लाखो वृक्षांची कत्तल होणार आहे.
पाहणीदरम्यान अडीच ते तीन हजार झाडे कापल्याचे भीषण दृश्य दिसले. साग, आंबा, फणस, काजू यांसारखी जुनी व बहुगुणी झाडे मृत अवस्थेत आढळली. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही यावर तीव्र संताप व्यक्त करत “सरकारने सह्याद्री विकायला काढला आहे!” अशी जळजळीत प्रतिक्रिया दिल्याचे भापकर यांनी नमूद केले.
या प्रकल्पस्थळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील, विद्यार्थी युवा नेते विवेकानंद पाटील आणि अनेक पर्यावरणप्रेमींनी भेट देऊन तीव्र विरोध नोंदवला.
सायंकाळी ७ वाजता कर्जत येथे झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत शेतकरी, आदिवासी आणि कातकरी समाजाने मोठा पाठिंबा दर्शवला. महाराष्ट्रात असे २३ जलविद्युत प्रकल्प आणि केंद्र व राज्य सरकारचे २३६ प्रकल्प येत असल्याचे सांगत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संवेदनशील सह्याद्रीच्या पर्वत रांगा ऐवजी हे प्रकल्प सौर किंवा पवन ऊर्जेच्या माध्यमातून पडीक जमिनींवर राबवले जावेत, अशी रास्त मागणी सभेत करण्यात आली.
पुणे, सोलापूर आणि कर्जत तालुक्यातील उजनी क्षेत्रात शेतकरी व आदिवासींना कोणतीही माहिती न देता एआय प्रकल्प, सौर ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजन प्रकल्प लादले जात आहेत. यामुळे उजनी धरण व पवित्र चंद्रभागा नदी विषारी होण्याचा धोका निर्माण झाला असून, त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे.
या विनाशकारी प्रकल्पांना रोखण्यासाठी उजनी क्षेत्रातील लढवय्ये शेतकरी शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता उजनी पुलावर भव्य रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.
“महाराष्ट्राचे वाळवंट करू पाहणाऱ्या या धोरणांविरोधात शेतकरी, वारकरी, मच्छीमार, आदिवासी आणि कामगारांनी रस्त्यावर उतरायलाच हवे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व कार्यकर्त्यांचा या लढ्याला पूर्ण पाठिंबा असून, ३१ ऑक्टोबरच्या आंदोलनात आम्ही सर्वजण ताकदीने सहभागी होणार आहोत.”
— मारुती भापकर (माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!