news
‘मोडकळीस आलेल्या PWD क्वार्टर्सच्या जागेवर उभारा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अन् वसतिगृह’; पिंपरी काँग्रेसची आक्रमक भूमिका!‘नागरिकांना फूस लावून सदनिकांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न; असामाजिक तत्त्वांवर मनपाची नजर’; निगडी सेक्टर २२ मधील घटनेवर कडक पावले!‘आरोग्य, रस्ते, शिक्षण अन् विद्युत व्यवस्थेच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समितीत कोट्यवधींच्या कामांवर शिक्कामोर्तब!‘पिंपरी-चिंचवडच्या कन्येचे कौतुकास्पद धाडस; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला इतरांचा जीव’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून सत्कार!‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गीता धनवडेचा शहराला अभिमान’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून कौतुक!
Home पिंपरी चिंचवड ‘नगरसेवक स्वेच्छा निधीचा अचूक विनियोग, २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता’; पिंपरी पालिकेचे परिपत्रक जारी!

‘नगरसेवक स्वेच्छा निधीचा अचूक विनियोग, २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता’; पिंपरी पालिकेचे परिपत्रक जारी!

रस्ते, पाणी, स्वच्छता आणि उद्यानांच्या विकासकामांना मिळणार गती; खासगी व अनधिकृत वस्त्यांमधील कामांवर बंदी | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

नगरसेवक स्वेच्छा निधीतून विकासकामे करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर; नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रभागस्तरावर स्थानिक, तातडीच्या आणि नागरी हिताच्या पायाभूत विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, निधीचा वापर करताना कामांचे महत्त्व, तातडी आणि नागरिकांना होणारा थेट लाभ विचारात घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
नगरसेवक स्वेच्छा निधीतून कामे सुचविताना एकत्रित मोठे काम, एकाच प्रभागातील विविध ठिकाणी लहान कामे किंवा बहुसदस्यीय प्रभागात एकत्रितपणे मोठे काम अशा पर्यायांचा विचार करता येणार आहे. संबंधित कामांसाठी अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी मंजूर असलेल्या निधीच्या मर्यादेतच खर्च करता येईल. एकापेक्षा अधिक नगरसेवकांना एकत्रित काम करावयाचे असल्यास निधीचे एकत्रीकरण सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करता येणार आहे.
नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यापूर्वी आवश्यक प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. २५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांना नियमानुसार अतिरिक्त आयुक्तांकडून प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली जाईल. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मोठ्या प्रस्तावांसाठी स्थायी समितीची पूर्वमान्यता घेणे अनिवार्य राहील.

 

नगरसेवक स्वेच्छा निधीतून पुढील नागरी सुविधांशी संबंधित कामांना प्राधान्य दिले जाईल. रस्ते, लहान पूल, पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, गटारे आणि पादचारी सुविधा. समाजमंदिरे, सार्वजनिक वाचनालये, प्राथमिक शाळांमधील आवश्यक दुरुस्ती. उद्याने, मनपाच्या जागांवरील खेळणी व व्यायाम साहित्य. सार्वजनिक शौचालये, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा.

 

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलेल्या मर्यादेनुसार पुढील कामांवर पूर्णपणे बंदी असेल. खासगी इमारतींची दुरुस्ती, अनधिकृत वस्त्यांमधील कामे, अनुदानित संस्थांची काही विशिष्‍ट कामे, मोठ्या स्वरूपाची स्वतंत्र नवीन बांधकामे आणि स्वेच्छा निधीच्या मूळ उद्देशाशी सुसंगत नसलेली कामे.

 

“नगरसेवक स्वेच्छा निधीतील कामे सुचविताना संबंधित नगरसेवकांची लेखी शिफारस, आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मान्यता आणि विहित कार्यपद्धतीचे पालन करणे आवश्यक राहील. शासन निर्णय व परिपत्रकातील तरतुदींनुसार निधीचा अचूक विनियोग करून नागरी सुविधांशी संबंधित कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी.”
— डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!