news
‘मोडकळीस आलेल्या PWD क्वार्टर्सच्या जागेवर उभारा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अन् वसतिगृह’; पिंपरी काँग्रेसची आक्रमक भूमिका!‘नागरिकांना फूस लावून सदनिकांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न; असामाजिक तत्त्वांवर मनपाची नजर’; निगडी सेक्टर २२ मधील घटनेवर कडक पावले!‘आरोग्य, रस्ते, शिक्षण अन् विद्युत व्यवस्थेच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समितीत कोट्यवधींच्या कामांवर शिक्कामोर्तब!‘पिंपरी-चिंचवडच्या कन्येचे कौतुकास्पद धाडस; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला इतरांचा जीव’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून सत्कार!‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गीता धनवडेचा शहराला अभिमान’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून कौतुक!
Home पिंपरी चिंचवड ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गीता धनवडेचा शहराला अभिमान’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून कौतुक!

‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गीता धनवडेचा शहराला अभिमान’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून कौतुक!

नवी दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात देशातील सर्वोत्तम ७ बालवैज्ञानिकांमध्ये स्थान; मनपा सभेत महापालिकेच्या वतीने गौरव | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या बालवैज्ञानिक कु. गीता धनवडे हिचा सर्वसाधारण सभेत भव्य सत्कार!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: नवी दिल्ली येथे आयोजित ‘इन्स्पायर मानक’च्या १२ व्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करत देशातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये स्थान मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील बालवैज्ञानिक कु. गीता गणपत धनवडे हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या गीताने १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात आपल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून ही उत्तुंग कामगिरी केली आहे. तिची देशातील सर्वोत्कृष्ट सात बालवैज्ञानिकांमध्ये निवड झाली असून, या यशामुळे तिला आता जर्मनी येथे अभ्यासासाठी जाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
गीताच्या या देदीप्यमान यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तिच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि अथांग मेहनतीचे कौतुक करत उपमहापौर शर्मिला बाबर यांनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या गौरव सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती),  प्रशांत शितोळे (सत्तारूढ पक्षनेते), भाऊसाहेब भोईर (विरोधी पक्षनेते), विश्वजीत बारणे (शिवसेना गटनेते), डॉ. कुलदीप जंगम (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा) यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, नगरसदस्य आणि पालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!