news
‘मोडकळीस आलेल्या PWD क्वार्टर्सच्या जागेवर उभारा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अन् वसतिगृह’; पिंपरी काँग्रेसची आक्रमक भूमिका!‘नागरिकांना फूस लावून सदनिकांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न; असामाजिक तत्त्वांवर मनपाची नजर’; निगडी सेक्टर २२ मधील घटनेवर कडक पावले!‘आरोग्य, रस्ते, शिक्षण अन् विद्युत व्यवस्थेच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समितीत कोट्यवधींच्या कामांवर शिक्कामोर्तब!‘पिंपरी-चिंचवडच्या कन्येचे कौतुकास्पद धाडस; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला इतरांचा जीव’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून सत्कार!‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गीता धनवडेचा शहराला अभिमान’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून कौतुक!
Home पिंपरी चिंचवड ‘प्रदीर्घ सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी पालिकेची खरा ठेवा’; मनपाच्या वतीने १७ सेवानिवृष्टांचा सत्कार!

‘प्रदीर्घ सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी पालिकेची खरा ठेवा’; मनपाच्या वतीने १७ सेवानिवृष्टांचा सत्कार!

नियत वयोमानानुसार १६ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेला १ कर्मचारी सन्मानित; मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांची प्रमुख उपस्थिती | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे ऑक्टोबर २०२६ अखेर १७ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त; सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सत्कार!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: महानगरपालिकेच्या सेवेत कार्यरत असताना विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या अनुभवातून, कौशल्यातून आणि समर्पित भावनेतून पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे महानगरपालिकेच्या कामकाजाला मोठे बळ मिळाले असून, त्यांनी केलेले कार्य आणि दिलेली सेवा सदैव स्मरणात राहील, अशी भावना सह आयुक्त मनोज लोणकर यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात त्यांनी निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवनाचा आनंद घ्यावा, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात आयोजित विशेष सत्कार सोहळ्यात ऑक्टोबर २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले १६ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १ असे एकूण १७ अधिकारी व कर्मचारी यांचा सह आयुक्त मनोज लोणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, संगणक अधिकारी उज्वला गोडसे, लघुलेखक सुनिता पळसकर, मनिषा कामथे, कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी- विकास घारे (उपअभियंता – स्थापत्य), वैशाली गायकवाड (लघुलेखक – उच्चस्तर), रजिया खान (सहाय्यक प्रशासन अधिकारी), सरिता मारणे (कार्यालय अधीक्षक), मनोज शिंदे (कार्यालय अधीक्षक), हेमलता लेंभे (सिस्टर इनचार्ज), बबीता वळसे (सिस्टर इनचार्ज), राजेंद्र भुरे (इले. मोटार पंप ऑपरेटर), वनिता क्षीरसागर (शिपाई), रायन्ना अनमोल (शिपाई), नजमुल्ला सिध्दकी (मजूर), चंद्रकांत जगताप (मजूर), सुधीर वडमारे (मजूर), भालचंद्र राव (मजूर), काळूराम वाघमारे (मजूर) आणि अशोक शेलार (मजूर).
स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या- कमला गायकवाड (सिस्टर इनचार्ज).

 

सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल या सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!