39

‘किल्ले घडवूया, इतिहास जपूया, देशभक्ती वाढवू या!’: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘महापौर-चषक भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६’चे आयोजन; प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये!
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांची अजरामर परंपरा आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सेवा सारथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, महापौर रवी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महापौर भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व शिवप्रेमी, किल्लेप्रेमी, गृहनिर्माण सोसायट्या आणि तरुण मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे. या स्पर्धेची सविस्तर माहिती सेवा सारथी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ओंकार गंगाधर मांडगे यांनी दिली.
स्पर्धेत उत्कृष्ट आणि कलात्मक किल्ले साकारणाऱ्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक ₹५१,०००/- ,द्वितीय क्रमांक ₹३५,०००/- , तृतीय क्रमांक ₹२१,०००/- , चतुर्थ क्रमांक ₹११,०००/- , पाचवा क्रमांक ₹१०,०००/- , सहावा क्रमांक ₹७,०००/-
याशिवाय सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
प्रत्येक सोसायटी किंवा विंगमधून एक किल्ला साकारता येईल. एका संघात जास्तीत जास्त ५ सदस्यांचा समावेश असावा. किल्ल्याची ऐतिहासिक माहिती व अचूकता, नैसर्गिक साहित्याचा वापर, कलात्मक मांडणी आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश या घटकांना परीक्षणात विशेष महत्त्व दिले जाईल. स्पर्धेसाठी नावनोंदणी पूर्णपणे विनामूल्य आहे. दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून तज्ज्ञ परीक्षकांकडून सोसायट्यांमध्ये जाऊन किल्ल्यांचे परीक्षण केले जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भव्य पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक घरात, प्रत्येक सोसायटीत आणि नव्या पिढीच्या मनामनात रुजावा, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. शहरातील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”— रवी लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका)
नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क- सेवा सारथी ७३५००४६६२५ , कार्तिक चव्हाण ७२७६३५८७०३ , आदर्श बोर्सुने ७२४९६८४८१८ , ओंकार मांडगे ८४२१८४६६२५ , स्वरूप कबाडे ८३९००८७३१२
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
