news
‘समान काम समान वेतन अन् ५ लाखांचा आरोग्य विमा’; यशवंतभाऊ भोसलेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका प्रशासन सकारात्मक!‘MPSC च्या ९ वादग्रस्त परीक्षांबाबत माहिती असल्यास पुढे या’; राज्य शासनाच्या चौकशी आयोगाचे नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवाहन!‘दिवाळीच्या साफसफाईतील जुन्या वस्तू फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात जमा करा’; पिंपरी पालिकेचा स्तुत्य उपक्रम!‘पिंपरी-चिंचवडकरांच्या करदात्यांच्या पैशांची लाचखोरी खपवून घेणार नाही’; भाऊसाहेब भोईर प्रशासनावर कडाडले!‘नगरसेवक स्वेच्छा निधीचा अचूक विनियोग, २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता’; पिंपरी पालिकेचे परिपत्रक जारी!
Home पिंपरी चिंचवड ‘अफवा अन् गैरप्रचाराला आळा घालून पक्षाची शिस्त जपणार’; भाजप शहर जिल्हा अनुशासन समितीत ६ अनुभवी चेहरे!

‘अफवा अन् गैरप्रचाराला आळा घालून पक्षाची शिस्त जपणार’; भाजप शहर जिल्हा अनुशासन समितीत ६ अनुभवी चेहरे!

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा निर्णय; ज्येष्ठ नेते, विधिज्ञ अन् लोकप्रतिनिधींना समितीत स्थान | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समिती जाहीर; सदाशिव खाडे, आमदार उमा खापरे यांच्यासह ६ जणांचा समावेश!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २९ ऑक्टोबर २०२६  मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पक्षांतर्गत संघटन सुरळीत व पारदर्शक रीतीने चालावे, पक्षाचा योग्य विस्तार व्हावा आणि निवडणूक कालखंडात कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवा, खोटी माहिती किंवा विरोधी प्रचाराला बळी न पडता जोमाने व एकजुटीने पक्षाचे काम करावे, यासाठी पक्षात कडक अनुशासन आणि शिस्त असणे अत्यंत आवश्यक असते. हीच शिस्त भारतीय जनता पार्टीची (BJP) खरी ओळख असून, ती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ‘भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीची’ अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न सिताराम काटे यांनी या समितीची अधिकृत घोषणा केली आहे. या अनुशासन समितीत पक्षाचे वरिष्ठ व ज्येष्ठ कार्यकर्ते, नावाजलेले विधिज्ञ, लोकप्रतिनिधी तसेच पक्ष संघटनेचा दीर्घकाळ अनुभव असलेल्या अभ्यासू पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीची अधिकृत यादी १) सदाशिव दादासाहेब खाडे (ज्येष्ठ नेते व माजी प्राधिकरणाध्यक्ष), २) आ. उमा गिरीश खापरे (विधान परिषद आमदार तथा ज्येष्ठ नेत्या), ३) ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे (ज्येष्ठ विधिज्ञ व पदाधिकारी), ४) ॲड. गोरखनाथ गेनबा झोळ (ज्येष्ठ विधिज्ञ), ५) प्रशांत कृष्णराव शितोळे (ज्येष्ठ कार्यकर्ते व अभ्यासक), ६) विकास हरिश्चंद्र डोळस (संघटन कौशल्याचा दीर्घ अनुभव असलेले कार्यकर्ते)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कार्य अधिक पारदर्शक, गतिमान आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे, याकडे ही समिती विशेष लक्ष देणार आहे. पक्षांतर्गत अंतर्गत मतभेद, शिस्तभंग किंवा वक्तव्यांवर लक्ष ठेवण्यासोबतच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ही समिती एक मजबूत आधारवड म्हणून काम करेल.
“पक्षाची धोरणे, विचारसरणी आणि शिस्त जपणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. निवडणूक काळात चुकीच्या अफवांना थारा न देता संघटितपणे काम करण्यासाठी ही अनुशासन समिती शहरात पक्षसंघटन अधिक बळकट करेल.”
— शत्रुघ्न काटे (शहराध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!