news
‘मोडकळीस आलेल्या PWD क्वार्टर्सच्या जागेवर उभारा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका अन् वसतिगृह’; पिंपरी काँग्रेसची आक्रमक भूमिका!‘नागरिकांना फूस लावून सदनिकांमध्ये घुसखोरीचे प्रयत्न; असामाजिक तत्त्वांवर मनपाची नजर’; निगडी सेक्टर २२ मधील घटनेवर कडक पावले!‘आरोग्य, रस्ते, शिक्षण अन् विद्युत व्यवस्थेच्या विकासासाठी महापालिका कटिबद्ध’; स्थायी समितीत कोट्यवधींच्या कामांवर शिक्कामोर्तब!‘पिंपरी-चिंचवडच्या कन्येचे कौतुकास्पद धाडस; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला इतरांचा जीव’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून सत्कार!‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गीता धनवडेचा शहराला अभिमान’; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून कौतुक!
Home पिंपरी चिंचवड ‘दिवाळीच्या साफसफाईतील जुन्या वस्तू फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात जमा करा’; पिंपरी पालिकेचा स्तुत्य उपक्रम!

‘दिवाळीच्या साफसफाईतील जुन्या वस्तू फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात जमा करा’; पिंपरी पालिकेचा स्तुत्य उपक्रम!

कपडे, पुस्तके, खेळणी व इलेक्ट्रॉनिक वस्तू गरजूंपर्यंत पोहोचवणार; मोशी, चिखली, वाकड, ताथवडेसह विविध भागांत मोहीम | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

दिवाळीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘आर.आर.आर.’ वस्तू संकलन मोहीम!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. २९ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: दिवाळीनिमित्त घरांची साफसफाई करताना वापरात नसलेल्या; मात्र चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तूंचा पुनर्वापर व्हावा आणि त्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात, या उदात्त उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व ‘स्वच्छ’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘आर.आर.आर. (रिड्यूस, रीयूज, रिसायकल) कलेक्शन ड्राइव्ह’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वस्तू संकलन मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
दिवाळीच्या स्वच्छता मोहिमेत अनेक घरांमध्ये जुने कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळणी, भांडी, चादरी, पडदे, फर्निचर तसेच वापरण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजूला काढल्या जातात. या वस्तू कचऱ्यात फेकून न देता त्यांचा पुनर्वापर व्हावा आणि गरजू नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी महापालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमाबाबत बोलताना सांगितले की, “कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वस्तूंचा पुनर्वापर आणि संसाधनांचा सुयोग्य वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. वापरण्यायोग्य वस्तू थेट कचऱ्यात टाकण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर केल्यास पर्यावरणावरील ताण कमी होतो. नागरिकांनी या ड्राइव्हमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून शहर पर्यावरणपूरक बनवण्यास हातभार लावावा.”
उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नागरिकांना आवाहन केले की, “नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या, परंतु सुस्थितीत असलेल्या वस्तू आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा कराव्यात. वस्तूंचा अपव्यय टाळणे आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संकलन होणारी ठिकाणे – रेनबो व्हिस्टा (आहेरनगर); सिद्धिविनायक विंड चाइम (रहाटणी); द वुड्स (वाकड); अक्षर एलिमेंटा व पॅलॅडिओ अपार्टमेंट (ताथवडे); द्वारका सनक्रेस्ट फेज १ व यश संकुल (पिंपळे सौदागर); ओमेगा पॅराडाइज, होरायझन्स ॲट वाकड व ला मेलोसा (वाकड); भूमी ओराबेल, सेलेस्टियल सोसायटी फेज २, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी, उदय हिलटॉप रेसिडेन्सी, संत ज्ञानेश्वर उद्यान व चंद्रभागा कॉर्नर (रावेत); तसेच रेणुका पंचतत्त्व (ताथवडे).

 

१ नोव्हेंबर २०२६ रोजी संकलन होणारी ठिकाणे- वुड्सव्हिल फेज १, फेज २ व फेज ३, लोटस नंदवन फेज १, कुमार प्रिन्सव्हिल फेज १ आणि सेंट्रल पार्क रेसिडेन्सी (मोशी); रिव्हर रेसिडेन्सी फेज ३ (चिखली); ऐश्वर्यम (आकुर्डी); गोखले वृंदावन (चिंचवड); ट्युलिप इन्फिनिटी वर्ल्ड (पुनावळे); मिलेनियम पॅसिफिक व वसंत ॲव्हेन्यू (ताथवडे); निसर्ग किरण (रहाटणी); गंगा स्काइज सोसायटी (वल्लभनगर, पिंपरी); आणि कुमार प्रथम (मोशी).

 

आर.आर.आर. कलेक्शन ड्राइव्हसंदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी किंवा मदतीसाठी नागरिकांनी ७०३०९०१९९३ किंवा ९१६८६८४६७० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!