news
‘समान काम समान वेतन अन् ५ लाखांचा आरोग्य विमा’; यशवंतभाऊ भोसलेंच्या आक्रमक भूमिकेनंतर महापालिका प्रशासन सकारात्मक!‘MPSC च्या ९ वादग्रस्त परीक्षांबाबत माहिती असल्यास पुढे या’; राज्य शासनाच्या चौकशी आयोगाचे नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवाहन!‘दिवाळीच्या साफसफाईतील जुन्या वस्तू फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात जमा करा’; पिंपरी पालिकेचा स्तुत्य उपक्रम!‘पिंपरी-चिंचवडकरांच्या करदात्यांच्या पैशांची लाचखोरी खपवून घेणार नाही’; भाऊसाहेब भोईर प्रशासनावर कडाडले!‘नगरसेवक स्वेच्छा निधीचा अचूक विनियोग, २५ लाखांपर्यंतच्या कामांना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता’; पिंपरी पालिकेचे परिपत्रक जारी!
Home पिंपरी चिंचवड ‘मुख्य मालक म्हणून महापालिका आयुक्तांनी जबाबदारी स्वीकारावी’; कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरीत भव्य पदयात्रा!

‘मुख्य मालक म्हणून महापालिका आयुक्तांनी जबाबदारी स्वीकारावी’; कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी पिंपरीत भव्य पदयात्रा!

समान काम-समान वेतन आणि ५ लाखांच्या विमा संरक्षणाची मागणी; कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांचा प्रशासनाला इशारा | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

कंत्राटी कामगारांच्या दिवाळी गोड करण्यासाठी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज पिंपरी पालिकेकडे ‘विनम्र अभियान पदयात्रा’!

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २८ ऑक्टोबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, यासाठी त्यांना ३ नोव्हेंबर २०२६ पूर्वी बोनस कायद्यानुसार सन २०२५-२०२६ या वर्षाचा बोनस आणि ऑक्टोबर २०२६ महिन्याचे वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी  गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा  कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वतीने एका भव्य ‘विनम्र अभियान पदयात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणारी ही पदयात्रा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीवर धडकणार असून, यावेळी महापालिकेचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मागण्यांचे अधिकृत निवेदन सुनावण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या सेवांमध्ये अहोरात्र मेहनत घेणाऱ्या तब्बल ४,५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील घटकांचा समावेश आहे. सफाई कर्मचारी, वाहनचालक, वैद्यकीय स्वच्छता सेवक, वार्ड बॉय, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी.  उद्यान विभागातील कर्मचारी, अग्निशमन विभागातील वाहनचालक व जवान, पालिकेच्या सर्व शाळांमधील स्वच्छता सेवक व शिपाई.  स्मशानातील सर्व कर्मचारी, तसेच पाणीपुरवठा व जलवाहिनी विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी.

 

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापालिका प्रशासनासमोर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. ३ नोव्हेंबरपूर्वी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोनस व ऑक्टोबर महिन्याचे वेतन मिळणे.  कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम, समान वेतनाचा लाभ देणे.  महापालिकेने कर्मचाऱ्यांचा ५ लाखांपर्यंतचा परिवारासह विमा उतरवावा.  सेवेत असताना अपघाताने किंवा आजारपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास २५ लाख रुपयांची आर्थिक भरपाई आणि अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत नोकरी देण्यात यावी.

 

पंधरा दिवसांपूर्वी उपकामगार आयुक्त अभय गीते यांच्या कार्यालयात पुणे येथे याप्रश्नी बैठक पार पडली होती. या बैठकीस महापालिकेचे कामगार अधिकारी प्रमोद जगताप हे उपस्थित होते. कंत्राटदारांनी वेतनातच बोनस समाविष्ट केल्याची खोटी बतावणी करून कर्मचाऱ्यांची फसवणूक करू नये आणि बोनस कायद्यानुसार त्वरित आदेश काढावेत, अशी सक्त सूचना उपकामगार आयुक्तांनी दिली होती.
मात्र, अद्यापही तसे कोणतेही आदेश किंवा पत्र कंत्राटदारांना किंवा कामगारांना मिळालेले नाही. कायद्यानुसार मुख्य मालक (Principal Employer) म्हणून कंत्राटदाराने बोनस व वेतन न दिल्यास ती देण्याची अंतिम जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे. मुंबई उच्च व सर्वोच्च न्यायालयाचेही यासंदर्भात स्पष्ट आदेश असतानापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराची निगा राखणाऱ्या, आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि अहोरात्र सेवा देणाऱ्या या ४,५०० हून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या घामाचा मोबदला आणि कायदेशीर हक्क ३ नोव्हेंबरपूर्वी मिळालाच पाहिजे. प्रशासनाने टाळाटाळ केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”
— यशवंतभाऊ भोसले (संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय श्रमिक आघाडी)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!